कोकण

किरीट सोमय्याविरोधात मालवणात घोषणाबाजी

CD

16993
मालवण ः ठाकरे गटाच्या वतीने भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेस महिलांनी काळे फासले.

किरीट सोमय्यांविरोधात
मालवणात घोषणाबाजी

महिलांनी प्रतिमेस काळे फासले

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १८ ः कथित व्हिडीओ क्लिपमुळे अडचणीत सापडलेले भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या विरोधात आज शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने आंदोलन करण्यात आले. सोमय्या यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. किरीट सोमय्या हा महाराष्ट्राला लागलेला कलंक असून त्यांची कृती महिलांचा अपमान करणारी आहे. भाजपा आताही त्याला पाठीशी घालणार काय? असा प्रश्न तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी यावेळी उपस्थित केला. या आंदोलनात महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
येथील शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, उमेश मांजरेकर, सन्मेश परब, पंकज सादये, बंड्या सरमळकर, महेश जावकर, महेंद्र म्हाडगुत, सिद्धेश मांजरेकर, अक्षय भोसले, दत्ता पोईपकर, करण खडपे, दीपा शिंदे, निनाक्षी शिंदे, सेजल परब, निना मुंबरकर, तृप्ती मयेकर, सुर्वी लोणे, हिना कांदळगावकर, पूजा तळाशीलकर, पूजा साळकर, स्मिता सरमळकर, लक्ष्मी पेडणेकर, माधुरी प्रभू आदी उपस्थित होते. भाजप सरकारने दिलेल्या संरक्षणात फिरणाऱ्या सोमय्या यांच्यावर भाजपचे सरकार कोणती कारवाई करणार की त्यांना संरक्षण देणार? महाराष्ट्रातील जनता या सोमय्याला हाकलून लावल्याशिवाय गप्प बसणार नाही. व्हिडीओच्या माध्यमातून महिलांची छेडछाड करण्याचा प्रयत्न त्याने केला असल्याचे खोबरेकर यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

SCROLL FOR NEXT