कोकण

कोकणची कला, संस्कृती जोपासण्याची गरज

CD

swt1414.jpg
M30542
कुडाळः मंगळागौर स्पर्धेतील विजेत्या संघाला गौरविताना भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत. सोबत संध्या तेरसे, दादा साईल, संजय वेंगुर्लेकर, साक्षी सावंत, रूपेश कानडे, पप्या तवटे, व अन्य. (छायाचित्रः अजय सावंत)

कोकणची कला, संस्कृती जोपासण्याची गरज
मंत्री रविंद्र चव्हाणः कुडाळातील मंगळागौर स्पर्धेस भेट, नवदुर्गा महिला मंडळ प्रथम
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १४ः कोकणातील संस्कृती, कला, सण जोपासले गेले पाहिजेत, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी मंगळागौर स्पर्धेत केले. या स्पर्धेत नवदुर्गा महिला मंडळ कुडाळ संघ विजेता ठरला.
भाजप नेते, कुडाळ-मालवण विधानसभा प्रमुख माजी खासदार निलेश राणे पुरस्कृत आणि भाजपा महिला मोर्चा आयोजित मंगळागौर स्पर्धेचे आयोजन केले होते. यात मोदी @९ संकल्पनेतून व महिलांसाठीच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यान्वित केलेल्या योजना ही संकल्पना घेऊन मंगळागौर फुगडी स्पर्धा कुडाळ भाजपा कार्यालयासमोरील सिंधुदुर्ग राजा गणपतीच्या सभामंडपात उत्साहात पार पडली. याला पालकमंत्री चव्हाण, भाजपा नेते माजी खासदार राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रदेश सदस्य दत्ता सामंत, नवनिर्वाचित महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर यांनी भेट दिली.
यावेळी पालकमंत्री चव्हाण म्हणाले, "जिल्ह्यातील भाजपच्या महिलांनी ''घरेलु कामगार'' या स्तुत्य उपक्रमाकडे लक्ष घालायला सुरुवात केली हे कौतुकास्पद आहे. प्रत्येक महिला तळागाळातील महिलांना शासनाच्या घरेलु कामगार योजनेचा लाभ कसा देता येईल? यासाठी करत असणारे कार्य ही निश्चितच या सर्व महिलांसाठी अनोखी भेट आहे. मंगळागौर कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी रक्षाबंधनाच्या दिवशी गॅसचे दोनशे रुपये कमी करून भेट दिली तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने महिलांसाठी विविध योजना राबविताना एसटी बसमध्ये ५० टक्के सवलत दिली आहे. भविष्यातही विकासाच्या दिशेने आमचे सरकार वाटचाल करणारे असेल."
यावेळी संध्या तेरसे, संजय वेंगुर्लेकर, दादा साईल, रूपेश कानडे, पप्या तवटे, सुनील बांदेकर, नागेश नेमळेकर, राकेश नेमळेकर आदी उपस्थित होते. सोहळ्याचे यशस्वी नियोजन कुडाळच्या महिला पदाधिकारी उषा आठल्ये, रेखा काणेकर, अदिती सावंत, साक्षी सावंत, प्रज्ञा राणे, साधना माडये, आरती पाटील, सुप्रिया वालावलकर, मुक्ती परब, तेजस्विनी वैद्य, विशाखा कुलकर्णी, अक्षता कुडाळकर, रेवती राणे, रचना नेरुरकर यांनी केले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक श्री नवदुर्गा संघ (कुडाळ), द्वितीय श्री सिद्धी गणपती संघ (कविलकाटे), तृतीय कुडाळेश्वर महिला संघ (कुडाळ), उत्तेजनार्थ प्रथम भैरव जोगेश्वरी संघ (कुडाळ), द्वितीय सखी फुगडी संघ (पावशी) यांनी मिळविला. एकता महिला संघ (तेंडोली), धनलक्ष्मी आकेरी संघ, भीमगर्जना संघ पाट आणि सिद्धाई ग्रुप कुडाळ या संघांनी सादरीकरण केले. तालुक्यातील ९ संघांनी यात सहभाग घेतला होता. स्पर्धेचे परिक्षण दीप्ती प्रभू व स्वाती रानडे यांनी केले तर निवेदन रूचिता शिर्के हिने केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

Pune Cyber Crime : लग्नाचे आमिष दाखवून पुण्यात ४३ वर्षीय महिलेला २६ लाखांचा गंडा; येरवड्यात गुन्हा दाखल!

Raj Thackeray: पैसे फेकले की जनता विकत मिळते? ठाकरे बंधूंचा सरकारला थेट सवाल, राज ठाकरे म्हणाले- निवडणूक जिंकण्यासाठी...

SCROLL FOR NEXT