कोकण

राजापूर-पावसाच्या दडीने शेतकरी चिंतेत

CD

फोटो ओळी
-rat१४p२५.jpg-KOP२३M३०५६८ राजापूर ः हिरवीगार झालेली भातशेती.


पावसाच्या दडीने शेतकरी चिंतेत

हळव्या पिकाला पाण्याची गरज; उत्पादनात घटण्याची शक्यता
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १४ : ऑगस्ट महिन्यामध्ये दडी मारलेला पाऊस सप्टेंबर महिन्यामध्ये बरसणार असल्याचे सार्‍यांकडून वर्तवण्यात येत असलेले अंदाज फोल ठरले आहेत. गेल्या आठवड्यात पावसाच्या सरी कोसळल्या. मात्र, गेल्या चार दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाने पाठ फिरवली आहे. कमी (हळवे) कालावधीची भातशेती सध्या फुलोर्‍यात असून येत्या काही दिवसांमध्ये तिचे दाणे भरण्याच्या स्थितीमध्ये रूपांतर होईल. या काळामध्ये पाऊस न झाल्यास भातशेतीच्या उत्पादनामध्ये सुमारे पंधरा ते वीस टक्के घट होण्याची शक्यता आहे.
ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाने दडी मारली होती. त्याचवेळी दिवसागणिक उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. कातळ परिसरातील भातशेती करपून जाण्याची आहे. गेल्या आठवड्यामध्ये पाऊस पुन्हा सुरू झाला होता. त्यामुळे कमी कालावधीची भातशेती फुलोर्‍यात आली असून काही दिवसांमध्ये त्याचे दाणे भरण्याच्या स्थितीमध्ये रूपांतर होणार आहे; मात्र गेले चार दिवस पावसाने पुन्हा पाठ फिरवली आहे. त्यामुळे उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे.
------------
चौकट
राजापुरातील चार दिवसांतील पाऊस
तारीख*पडलेला पाऊस (मिलिमीटर)
१०सप्टेंबर * ५.१२५
११सप्टेंबर*७.७५
१२ सप्टेंबर* ४.७५
१३सप्टेंबर* २

कोट
गेल्या आठवड्यात पडलेला पाऊस भातशेतीसाठी उपयुक्त ठरला असून, भातशेतीही चांगली आहे. पुढील आठवड्यामध्ये चांगला पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्याप्रमाणे पाऊस पडल्यास भातशेतीतून समाधानकारक उत्पादन मिळेल; मात्र पावसाने दडी मारल्यास उत्पादनामध्ये सुमारे पंधरा-वीस टक्के घट होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
--अनिल गावीत, कृषी अधिकारी, राजापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, टपरीवर झाड कोसळून महिलेचा मृत्यू; नवश्या मारूती परिसरात दुर्घटना

Latest Marathi News Live Update : KDMC च्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे?

Income Tax: आयकर विभागाकडून सर्व 7 ITR फॉर्म जारी! कुणासाठी कोणता फॉर्म, ITR-U आणि ITR-V नेमकं काय समजून घ्या

पुण्याला सलग चौथ्या दिवशी पावसानं झोडपलं, घरांमध्ये शिरलं पाणी; काही ठिकाणी गारपीट

Talwar Baba: भयंकर! तंत्र-मंत्र आणि भीतीचा खेळ... महाराष्ट्रातील ‘तलवार बाबा’चा काळा चेहरा उघड; 'असं' करायचा शोषण

SCROLL FOR NEXT