

Heavy Rain Hits Pune for Fourth Consecutive Day
Esakal
Pune Rain News: गेल्या आठवड्याभरापासून राज्यातील काही भागांमध्ये पावसानं हजेरी लावलीय. तर पुण्यात सलग चौथ्या दिवशी जोरदार पाऊस पडत आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस आल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली. पुणे जिल्ह्यात हवामान विभागाने आज पावसाचा यलो अलर्ट दिलाय. पुण्यात पावसासह गाराही पडत असून अचानक आलेल्या पावासमुळे नागरिक हैराण झाले आहेत.