८ (पान २ साठी)
rat१६p२४.jpg -
२४M६५४५०
राजापूर ः इचलकरंजी येथील अनुष्का भंडारी हिला गौरवताना व्यापारीसंघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर, रिक्षा सेना चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष संजय पवार आणि मान्यवर.
लावणी स्पर्धेत अनुष्का भंडारी विजयी
राजापुरात आयोजन; सृष्टी जाधव द्वितीय
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १६ : रिक्षा सेना चालक-मालक संघटना, रिक्षाचालक-मालक सौभाग्यवती संघटना राजापूरच्यावतीने आयोजित सोलो लावणी नृत्यस्पर्धेमध्ये इचलकरंजी येथील अनुष्का भंडारी हिने विजेतेपद पटकावले. सातारा येथील सृष्टी जाधव आणि कणकवली येथील पूर्वा मिस्त्री यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक तर महाड येथीस मनाली निवेलकर हिने उत्तेजनार्थ पारीतोषिक पटकावले.
शहरात झालेल्या कार्यक्रमामध्ये स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम आणि आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले. श्री सत्यनारायण महापूजच्या निमित्ताने सोलो लावणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कुडाळ, सावंतवाडी, राजापूर, कणकवली, कराड, इचलकरंजी, पालये, सातारा, महाड, बीडमधील, देवगड यांसह राज्यभरातील मोठ्या संख्येने कलाकार सहभागी झाले होते. तत्पूर्वी, सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल विविध संस्थांचे पुरस्कार विजेते व्यापारीसंघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर, नायब तहसीलदार दीपाली पंडित, शिक्षक विलास जाधव, मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांच्यासह प्रामाणिक रिक्षा व्यावसायिक म्हणून हसन ठाकूर, याकूब कुडाळकर, जुनेद गडकर, प्रेमप्रकाश कारेकर, राजापूर अर्बन बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष अनामिका जाधव, उपाध्यक्ष विवेक गादीकर, अर्बन बँकेचे संचालक प्रकाश कातकर यांचा सत्कार करण्यात आला. लकी ड्रॉ विजेती प्रेरणा चिंबुलकर यांनाही गौरवण्यात आले. साई दुधवडकर दाम्पत्याला पूजेला बसण्याचा मिळाला. विजय अमरे आणि सहकाऱ्यांनी अयोध्या मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये ही पूजा बांधली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.