Bahadur Shaikh Naka National Highway Authority
Bahadur Shaikh Naka National Highway Authority esakal
कोकण

Bahadur Shaikh Naka : उड्डाणपुलाच्या पिलरवर बसवलेले सर्वच गर्डर तोडले; आता नव्या आराखड्यानुसार होणार महामार्गाचं काम

सकाळ डिजिटल टीम

चिपळूणजवळ परशुराम घाटातील धोकादायक आणि आव्हानात्मक कामही पावसाळ्यानंतर झपाट्याने पूर्ण होत आले आहे.

चिपळूण : बहादूरशेख नाका (Bahadur Shaikh Naka) येथील उड्डाणपुलाच्या पिलरवर बसवलेले सर्वच गर्डर तोडण्यात आले आहेत. आता नव्या डिझाईननुसार काम सुरू होणार आहे. उड्डाणपुलाच्या बांधकामाचे गर्डर ऑक्टोबर २०२३ मध्ये कोसळून झालेल्या अपघातामुळे या टप्प्यातील कामाचे वेळापत्रक दीर्घकाळासाठी पुढे गेले आहे. आता नव्या डिझाईननुसार कामाची प्रतीक्षा आहे.

राज्य सरकार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (National Highway Authority) ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत मुंबई-गोवा महामार्गावरील सर्व कामे पूर्णत्वास जातील, असे आश्वासन मुंबई उच्च न्यायालयाला (Mumbai High Court) दिले आहे. या कामात होणाऱ्या विलंबाबाबत वकील ओवेस पेचकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने राज्य सरकारला खडसावले होते.

मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa Highway) गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली रस्त्यांची कामे ३१ डिसेंबर २०२३ पूर्वी पूर्ण होतील, असे केंद्र आणि राज्य सरकारकडून सांगण्यात येत होते. मात्र, ती मुदतही टळून गेली. पर्यावरणविषयक परवानग्या मिळण्यास झालेला उशीर, भूसंपादनाची रखडलेली कामे, कंत्राटदारांची निष्क्रियता आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यामुळे महामार्गाची कामे रखडली आहेत. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरण आणि दुरुस्तीच्या कामांसह इतर सर्वच गोष्टींची कामे ३१ डिसेंबर २०२४ च्या आत पूर्ण करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

चिपळूणजवळ परशुराम घाटातील धोकादायक आणि आव्हानात्मक कामही पावसाळ्यानंतर झपाट्याने पूर्ण होत आले असून, घाटातील दोन्ही मार्गिका लवकरच पूर्ण होतील, अशी अपेक्षा आहे. बहादूरशेख नाका येथे गर्डर तोडल्यानंतर निर्माण झालेले टाकाऊ भाग बहादूरशेख नाका येथून हटवण्यात आले आहे.

बहादूरशेख नाका येथील उड्डाणपुलाच्या पिलरवर बसवलेले सर्वच गर्डर तोडण्यात आले आहे. येथील जागा स्वच्छ करून नव्याने कामाची तयारी सुरू केली आहे. लवकरच कामाला सुरुवात होईल. सद्यःस्थितीत प्राथमिक तयारी सुरू आहे. नव्या डिझाईननुसार उड्डाणपुलाच्या कामाचे नियोजन केले जात आहे.

-राजेंद्र कुलकर्णी, उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, चिपळूण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accindet: कोणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update: बंगालमध्ये वाद पेटला, TMC-ISF समर्थकांमध्ये हाणामारी, भाजपचा आरोप- पराभवाच्या भीतीने हिंसाचार

Amhi Jarange: 'आम्ही जरांगे -गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका; टीझर रिलीज

Cristiano Ronaldo: शेवटच्या क्षणी पराभव, नेमारनंही डिवचलं अन् रोनाल्डोला अखेर अश्रु अनावर, पाहा Video

Chennai-Mumbai Flight: 172 प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, विमान अज्ञात स्थळी हलवले

SCROLL FOR NEXT