कोकण

स्पर्धा परीक्षा, उद्योजकतेचे देवगड महाविद्यालयात धडे

CD

68681
देवगड ः केळकर महाविद्यालयात विद्यार्थी गौरव करण्यात आला.

स्पर्धा परीक्षा, उद्योजकतेचे
देवगड महाविद्यालयात धडे

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ३ ः येथील स. ह. केळकर महाविद्यालयातील महिला विकास कक्ष व जिल्हा कौशल्य विकास स्वयंरोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात ‘स्त्री-पुरुष समानता, बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अभियान अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन केले होते. यामध्ये मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे गणेश चिमणकर, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक गोविंद परब मार्गदर्शक होते. कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात चिमणकर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व उद्योजकता यामध्ये करिअर निर्माण करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करून शासनाच्या विविध योजनांमधून विद्यार्थ्यांना होणारी मदत याबाबत माहिती दिली. कार्यशाळेच्या द्वितीय सत्रात परब यांनी विद्यार्थ्यांना उद्योजकतेसाठी विविध मार्गदर्शनाचा मार्ग, विविध योजनांच्या माध्यमातून होणारे अर्थसहाय्य व स्वयंरोजगार याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटी, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम विभागाच्या वतीने घेतलेल्या ‘महाराष्ट्र स्टुडंट्स इनोव्हेशन चॅलेंज २०२३’ स्पर्धेचा जिल्हास्तरावरील निकाल घोषित करण्यात आला. यात प्राची कदम हिने यश प्राप्त करून एक लाखाचे बक्षीस मिळविले होते. तिच्या या यशाचेही या कार्यक्रमाच्या निमित्ताने कौतुक करून सत्कार करण्यात आला. महिला विकास कक्ष समन्वयक सुखदा जांभळे यांनी प्रास्ताविक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्जमाफीसाठी आधार प्रमाणीकरण बंधनकारक! आपले सरकार सेवा केंद्रात घेऊन जावा आधारकार्ड, ॲग्रीस्टॅक क्रमांक, मगच पैसे जमा होतील; याद्यांमध्ये आडनावे, गावांची नावे चुकली

Rahul Gandhi: विद्यार्थ्यांवरील लाठीमाराचा आदेश कोणी दिला? गृहमंत्री अमित शहा यांना पत्राद्वारे राहुल गांधी यांची विचारणा

आजचे राशिभविष्य - २७ जुलै २०२६

Kulith Soup: पावसाळा स्पेशल हुलग्याचं माडगं! सर्दी-खोकल्यासाठी घरगुती आणि पारंपरिक उपाय

आजचे शास्त्रशुद्ध पंचांग 27 जुलै 2026! तिथी, योग आणि शुभ-अशुभ वेळा

SCROLL FOR NEXT