rahul gandhi
sakal
नवी दिल्ली: ‘‘विद्यार्थ्यांवर २० जुलै रोजी झालेल्या आंदोलनावेळी लाठीमार करण्याचा आदेश कोणी दिला होता?’’ अशी विचारणा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची गृहमंत्री अमित शहा यांना पत्राद्वारे केली आहे. ‘‘विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला करणे, अश्रुधुराच्या कांड्या फोडणे आणि पॅलेट गनच्या वापराला कोणी परवानगी दिली, हे स्पष्ट झाले पाहिजे, तसेच या प्रश्नांच्या अनुषंगाने सरकारची जबाबदारी निश्चित व्हावयास हवी,’’ असे गांधी यांनी म्हटले आहे.