

Nourish Your Body With Traditional Kulith Madga
esakal
Power Up Your Immunity With Kulith Soup: पावसाळा सुरू झाला की वातावरणातील गारव्यामुळे सर्दी, खोकला आणि फ्लू यांसारखे आजार वेगाने पसरतात. अशा बदलत्या हवामानात शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि नैसर्गिक ऊब टिकवून ठेवण्यासाठी महाराष्ट्रीयन घरांमध्ये पारंपरिक 'हुलग्याचं माडगं' (कुळीथ सूप) आवर्जून केले जाते. प्रकृतीने उष्ण असलेल्या कुळीथाचे हे सूप पावसाळी आजारांवर एक उत्तम घरगुती औषध मानले जाते.