11979
खारेपाटण कोष्टीआळीमध्ये
नऊ फुटी अजगर पकडला
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १५ ः खारेपाटण (ता.कणकवली) कोष्टेआळी येथे आलेल्या नऊ फुटी अजगराला सर्पमित्र युवती भक्ती पिसे हिने मोठ्या कौशल्याने पकडून जंगलात सोडून जीवदान दिले.
भक्ती पिसे ही खारेपाटण दशक्रोशीत नव्याने सर्प मित्र म्हणून उदयास येत आहे. आतापर्यंत तिने अनेक जंगली विषारी व बिनविषारी सापांना पकडले आहे. काल (ता.१४) रात्री तिला कोष्टेआळी येथे एक अजगर आल्याची माहिती मिळाली. तीने तत्काळ त्या ठिकाणी जात त्या अजगराला मोठ्या शिताफिने पकडले. तो अजगर नऊ फुटी असून वजन सुमारे २५ किलो होते. तिच्या या धाडसाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.