Yashasvi Jaiswal : 'जर कोणी हद्द पार करत असेल, तर...', हर्षा भोगलेंच्या व्हिडिओवर जैस्वालची तिखट कमेंट; नेमकं काय घडलंय?

Yashasvi Jaiswal hit back at Harsha Bhogale: श्रीलंका विरुद्ध भारत संघात दुसरा कसोटी सामना कोलंबोमध्ये सुरू असून पहिल्याच दिवशी यशस्वी जैस्वाल आणि असिथा फर्नांडो यांच्यात वाद झाले. त्यावर हर्षा भोगले यांनी प्रतिक्रिया दिली. पण त्यावर जैस्वालने तिखट शब्दात प्रत्युत्तर दिले आहे.
Yashasvi Jaiswal hit back at Harsha Bhogale | Sri Lanka vs India 2nd Test

Yashasvi Jaiswal hit back at Harsha Bhogale | Sri Lanka vs India 2nd Test

Sakal

Updated on

Sri Lanka vs India 2nd Test Marathi News: भारत विरुद्ध श्रीलंका संघात दुसरा कसोटी सामना कोलंबोमध्ये सुरू आहे. या सामन्यात पहिल्या दिवशी भारतीय संघाने वर्चस्व ठेवले असले तरी एक घटना चर्चेत राहिली. पहिल्याच दिवशी भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि श्रीलंकेचा गोलंदाज असिथा फर्नांडो (Asitha Fernando) यांच्यात वाद झाले.

त्यावरून बरीच चर्चा सुरू असून आता या घटनेवर अनुभवी समालोचक हर्षा भोगले (Harsha Bhogale) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या प्रतिक्रियेवर खुद्द जैस्वालनेच प्रत्युत्तर देत स्वत:च्या कृतीला पाठिंबा दिला आहे.

Yashasvi Jaiswal hit back at Harsha Bhogale | Sri Lanka vs India 2nd Test
IND vs SL: यशस्वी जैस्वालचा श्रीलंकन गोलंदाजाशी वाद; हेल्मेटचा संपर्क, आता कारवाई होणार का? ICC चा नियम काय सांगतो?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com