कोकण

मिनी बस बंदमुळे प्रवाशांची गैरसोय

CD

16183

मिनी बस बंदमुळे प्रवाशांची गैरसोय
मालवणातील स्थितीः दिवाळीपूर्वी सुरु न केल्यास आंदोलनाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ३ः तारकर्ली देवबाग या पर्यटन गावासाठी मालवण एसटी आगारातून यापूर्वी सोडण्यात येणाऱ्या मिनी बस बंद झाल्याने शाळा, कॉलेजचे विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय होत आहे. सध्या सोडण्यात येणाऱ्या मोठ्या एसटी बस बेभरवशी व गैरसोयीच्या असून तारकर्ली देवबाग मार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे अडचणीच्या ठरत आहेत. तसेच या बस जुन्या व नादुरुस्त बनल्या असल्याने मालवण एसटी आगाराने नवीन दोन मिनी बस व सहा मोठ्या एसटी बस दिवाळीपूर्वी उपलब्ध कराव्यात; अन्यथा २५ ऑक्टोबरला एसटी आगारासमोर उपोषणास बसू, असा इशारा तारकर्ली येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश बापर्डेकर यांनी आगारप्रमुख अनिरुद्ध सूर्यवंशी तसेच वाहतूक महाव्यवस्थापक मुंबई व विभाग नियंत्रक सिंधुदुर्ग यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
तारकर्ली व देवबाग हे पर्यटन गाव असल्याने गावात गाड्यांची आणि पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ नेहमीच चालू असते. यामुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याने पूर्वी दोन मिनी बस या मार्गावर चालू होत्या. मात्र, या मिनी बस खराब झाल्याने मोठी बसची फेरी सुरु करण्यात आली. मात्र, मोठी बस पूर्ण देवबागपर्यंत पोहोचत नाहीत. पर्यटन हंगामात वाहतूक कोंडीमुळे तसेच पावसाळ्यात काही बस फेऱ्या मध्येच तारकर्ली येथे वळून परत जातात किंवा अचानक फेऱ्या बंद कराव्या लागतात. अशावेळी गावातील प्रवासी, नागरिक तसेच शाळा, कॉलेज व इतर कोर्सेससाठी मालवणला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होते. मनस्ताप सहन करावा लागतो. या मार्गावर जर नवीन मिनी बस आल्यास मुलांच्या सोईकरिता मालवण आगारातून सकाळी व सायंकाळी चार फेऱ्या मुलांच्या वेळेनुसार बाजारपेठ मार्गे सोडून सर्वांची होणारी गैरसोय दूर होईल, अशी मागणी बापर्डेकर यांनी प्रसिद्धी पत्रकात केली आहे.
मिनी बसकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना १८ जानेवारी २०२३ यांना पत्र दिल्यानंतर त्यांनी अहवाल मागितला तो शासन जवळ महाव्यवस्थापक कार्यालयातून मंजुरीला पाठविला. तो प्रस्ताव मंजुरी येऊनही प्रशासन खरेदी अगर भाडे तत्वावर गाड्या घेत नाही, त्यामुळे याच्या निषेधार्थ आपल्याला आमरण उपोषणाचा मार्ग पत्करावा लागला आहे. महाव्यवस्थापक आणि वरिष्ठ प्रशासन यांच्या निष्काळजी कामामुळे मालवण आगार समोर उपोषणाला बसावे लागत आहे, असेही बापार्डेकर यांनी म्हटले आहे. श्री. बापर्डेकर यांनी श्री. सुर्यवंशी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी त्यांच्यासमवेत देवबाग तारकर्लीचे रामचंद्र चोपडेकर, किशोर कुबल, बबन मांजरेकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: एप्रिल महिन्यात सोन्याच्या भावात मोठा बदल! अक्षय तृतीयेआधी बाजारात उलटफेर; जाणून घ्या आजचा भाव

विधान परिषदेच्या १७ जागांवर लवकरच निवडणूक, तर ९ सदस्यांचा कार्यकाळ संपणार; कुणाला किती जागा मिळणार?

Japanese Encephalitis: जपानी मेंदूज्वराविरोधात राज्य सरकार सतर्क; लसीकरण मोहिमेवर विशेष भर, आजारावर प्रभावी नियंत्रण आवश्यक!

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत उष्माघाताचा पहिला बळी; ४०°C तापमानामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Jalgaon Crime : लेकीच्या मानेवरच्या जखमांनी आईचे काळीज चिरले! हात स्कार्फने बांधून 17 वर्षीय मुलीवर अत्याचार; हुंदके देत पीडितेने सांगितली 'आपबीती'

SCROLL FOR NEXT