कोकण

त्या कंपनीवर गुन्हा दाखल करा

CD

-ratchl221.jpg-
24N20596
चिपळूण ः पोलिस निरीक्षकांना निवेदन देताना काँग्रेसचे पदाधिकारी.
----------------

‘त्या’ कंपनीवर गुन्हा दाखल करा

चिपळुणातील अपघात ; महिलेचा उपचाराचा खर्चही करावा

चिपळूण, ता. २२ ः शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर विंध्यवासिनी रोडजवळ ट्रेलर ट्रक व दुचाकीचा अपघात होऊन महिला गंभीर जखमी झाली. या अपघातप्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे; मात्र या अपघातास राष्ट्रीय महामार्गाचे काम करणारी कंपनी जबाबदार असून तिच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पोलिस निरीक्षकांना निवेदन देत केली आहे.
येथील राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लियाकत शाह व पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले आहे. शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर साईडपट्टी न सोडता लावलेल्या बॅरिकेटमुळे येथे रस्ता अरूंद झाला आहे तसेच रस्त्यावर वाळूचे बारीक कण असल्यामुळे दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढत आहे. याबाबत वारंवार राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या संबधित कंपनी व्यवस्थापकांना कळवून देखील त्यांनी चुकीच्या पद्धतीने बॅरिकेटस लावल्याने हा अपघात झाला. या घटनेचे गांभीर्य पाहता संबधित कंपनी व त्यांचे व्यवस्थापक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. यापुढे जखमी महिलेच्या उपचारासाठीचा सर्व खर्च कंपनी व्यवस्थापकांनी करावा, अशी मागणीही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain News : मुंबईत पहिल्याच पावसाने अनेक ठिकाणी पाणी तुंबले, लोकल सेवेवर परिणाम; पुढील काही तास धोक्याचे, हवामान विभागाचा इशारा

महिलांचे महिला व बालविकास कार्यालयात हेलपाटे! मुख्यमंत्र्यांच्या ‘लाडक्या बहिणीं’ना दरमहा लाभ नाहीच; २१ वर्षे पूर्ण झालेल्या महिलांना करता येईना अर्ज

मोठी बातमी! विद्यार्थ्यांना परीक्षेच्या ३ महिने आधी समजणार वेळापत्रक; विद्यापीठाची पहिली सत्र परीक्षा ऑक्टोबरमध्ये, द्वितीय सत्र परीक्षा मार्चअखेर

विशेष : शब्दांपासून आकर्षक आकृतीपर्यंत

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

SCROLL FOR NEXT