Cristiano Ronaldo breaks multiple World Cup records against Uzbekistan
esakal
Ronaldo becomes first player to score in six World Cups :
सहा वर्ल्ड कप स्पर्धेत गोल करणारा जगातील पहिला खेळाडू
पोर्तुगालसाठी वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक गोल करणारा खेळाडू
एकाच सामन्यात दोन गोल करणारा स्पर्धा इतिहासातील वयस्कर खेळाडू
पोर्तुगालसाठी वर्ल्ड कपमध्ये गोल करणारा तरुण व वयस्कर खेळाडू
ख्रिस्तियानो रोनाल्डो( Cristiano Ronaldo) जेव्हा जोमाने खेळतो, तेव्हा एक नव्हे तर अनेक विक्रम त्याच्या पायाशी लोटांगण घालतात.. हेच फिफा वर्ल्ड कप स्पर्धेतील उझबेकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पाहायला मिळाले. लिओनेल मेस्सी, किलियन एम्बाप्पे मैदान गाजवत असताना रोनाल्डोला फार काही चमक दाखवता आली नव्हती आणि त्यामुळे चाहते निराश होते. पण, त्याने सर्व उणीव मंगळवारी झालेल्या सामन्यात भरून काढली. त्याने दोन गोल करून पोर्तुगालसाठी महत्त्वाच्या सामन्यात निर्णायक खेळ केला. पोर्तुगालने ५-० अशा फरकाने हा सामना जिंकून बाद फेरीच्या दिशेने कूच केली आहे.