कोकण

-क्राईम

CD

गोवा बनावटीची
बारा लाखांची दारु जप्त

लांजा ः लांजा पोलिसांनी देवधे येथील हॅप्पी धाबासमोर विनापरवाना गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्‍या खालापूर (जि. रायगड) येथील एकावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी १२ लाख ७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संदेश विलास मांडे (वय ३४, रा. तळेगाव, ता. खालापूर) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २१) सायंकाळी सहाच्या सुमारास निदर्शनास आली. मांडे हा मोटारीतून विनापरवाना गोवा मद्याची वाहतूक करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तो जप्त करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
-------
गोठ्यावर वीज पडून
तीन जनावरे दगावली
साडवली ः संगमेश्वर तालुक्यातील वाशीतर्फे-देवरूख येथील शेतकऱ्याच्या गोठ्यावर वीज पडून गोठ्यातील दोन बैल व एक दुभती गाय मृत झाली. तसेच तीन जनावरे जखमी झाली. ही घटना सोमवारी (ता. २१) रात्री नऊच्या सुमारास घडली. यामध्ये शेतकरी दत्ताराम पेंढारी यांचे एक लाख ६० हजारांचे नुकसान झाले आहे. या बाबत माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी गुरांवर उपचार करणे व मृत्यू पडलेल्या गुरांचे विच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने आपत्तीमधील जखमी जनावरांना सुखरूप बाहेर काढून मदतकार्य करण्यात आले. घटनेचा पंचनामा तलाठी द्वारकेश तायडे, ग्रामसेवक समीक्षा मोहिते, सरपंच सुनील सावंत, ग्रामपंचायत सदस्या अनुष्का सावंत यांनी केला. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते. या पंचनाम्यात पेंढारी यांचे अंदाजे एक लाख ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. जखमी जनावरांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले असून, जखमी तीन गायी सुखरूप आहेत.
---
पावसमधील जुगारावर छापा

पावस. ः पावस बसस्थानक येथील एका दुकान गाळ्याच्या पाठीमागे विनापरवाना जुगारावर पोलिसांनी कारवाई. संशयिताविरुद्ध पूर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन पांडुरंग बंडबे (रा. कोळंबे गोरीवलेवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २१) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास निदर्शनास आली. सचिन बंडबे यांच्याकडे मटका जुगाराचे साहित्यासह १ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल सापडला. या प्रकरणी प्रशांत पाटील यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain News : मुंबईत पहिल्याच पावसाने अनेक ठिकाणी पाणी तुंबले, लोकल सेवेवर परिणाम; पुढील काही तास धोक्याचे, हवामान विभागाचा इशारा

महिलांचे महिला व बालविकास कार्यालयात हेलपाटे! मुख्यमंत्र्यांच्या ‘लाडक्या बहिणीं’ना दरमहा लाभ नाहीच; २१ वर्षे पूर्ण झालेल्या महिलांना करता येईना अर्ज

मोठी बातमी! विद्यार्थ्यांना परीक्षेच्या ३ महिने आधी समजणार वेळापत्रक; विद्यापीठाची पहिली सत्र परीक्षा ऑक्टोबरमध्ये, द्वितीय सत्र परीक्षा मार्चअखेर

विशेष : शब्दांपासून आकर्षक आकृतीपर्यंत

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

SCROLL FOR NEXT