कोकण

नाचणे-गणेश कॉलनी येथे भरदिवसा घरफोडी

CD

नाचणे, गणेश कॉलनीत भरदिवसा घरफोड्या
४ लाख ४१ हजार ९०० रुपयांचा ऐवज पळविला ः चोरट्याविरुद्ध गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ ः शहरातील गणेश कॉलनी येथे चोरट्याने भरदिवसा घरफोडी करून ४ लाख ४१ हजार ९०० रुपयांसह दागिन्यांवर डल्ला मारला. मतमोजणीच्या जल्लोषाचा फायदा घेऊन चोरट्याने श्रीरामनगर आणि गणेश कॉलनी येथे डल्ला मारला. शहर पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. २३) दुपारी दोन ते चार या कालवधीत फिर्यादी राहत असलेल्या श्रीरामनगर-नाचणे व गणेश कॉलनी येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला राहत असलेल्या श्रीरामनगर-नाचणे येथून दुपारी दोन ते चार या वेळात घरात कुणीही नसल्याचा फायदा घेऊन चोरट्याने दरवाजाच्या कडीकोयंडा उचकटून ३ लाख ५९ हजार ४०० रुपयांवर डल्ला मारला. त्यानंतर गणेश कॉलनी येथील नागेश गजबार यांच्या घरातील ८२ हजार ९०० रुपये, यामध्ये प्लास्टिकच्या डब्यात ठेवलेले २५ हजार, ३ हजार ५०० रुपये मुलांच्या पिगी बॅंकमधील, कपाटातील १४ हजार ९०० रुपये, १ लाख २२ हजार ५०० रुपयांचे मंगळसूत्र, ७० हजारांचा सोन्याचा हार, २१ हजारांची ठुशी, ५२ हजार ५०० रुपयांची सोन्याची चेन, १७ हजार ५०० रुपयांची सोन्याची चेन, ७० हजार रुपयांच्या कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या नोटा आणि १२ हजार ५०० रुपयांचे कानातील पट्ट्या असा एकूण ४ लाख ४१ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला. चोरटा नागरिकांच्या नजरेस पडला आहे. त्याचे वय अंदाजे ३० आहे. रंग सावळा, चेहरा उभा, दाढी-मिशी आहे. काळ्या रंगाचा फुल टी शर्ट व डोक्यात टीशर्टची टोपी आहे. राखाडी रंगाची जिन्स त्याने पॅन्ट व काळ्या रंगाचे चप्पल आहे. याप्रकरणी फिर्यादी महिलेने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीवरून शहर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली आहे. वर्णनावरून त्याचा शोध घेतला जात आहे. अधिक तपास शहर पोलिस अंमलदार करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वाहतुकीसाठी देशात 1,800 किमी पाइपलाइन; कोणकोणत्या राज्यांतून जाणार? काय बदलणार? वाचा...

Sugar Industry: साखर कारखान्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! ४ हजार कोटींचे सॉफ्ट लोन, व्याजाचा भारही सरकार उचलणार

Eknath Shinde: चाकणमधील उद्योगांचे स्थलांतर रोखणार’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्योजकांच्या समस्यांवर घेतले महत्त्वाचे निर्णय

Maratha Reservation: जरांगेंच्या आंदोलनाबाबत छगन भुजबळांचा मोठा दावा; म्हणाले, ‘लढाई ओबीसींविरोधात नाही, सरकारविरोधात’

US-Iran War: आम्हाला व्हेनेझुएला बनवायला निघाले होते; इराणचा ट्रम्प यांच्यावर घणाघात, राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला टोला

SCROLL FOR NEXT