कोकण

खेड-खेडमध्ये प्लास्टिक बंदीचा पुरता फज्जा

CD

प्लास्टिक बंदीचा
खेडमध्ये पुरता फज्जा
खेड, ता. २४ : खेड शहरात प्लास्टिक बंदीचा पुरता फज्जा उडाला आहे. नगरपालिकेची यंत्रणा विधानसभा निवडणूक प्रक्रियेत गुंतल्याचा फायदा उठवत सर्रासपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जात आहे.
प्लास्टिक पिशव्यांच्या वापरास बंदी असतानाही शासनाचे आदेश पायदळी तुडवत प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जात आहे. यापूर्वी नगरपालिकेने प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्यांना दणका दिला होता. मात्र कारवाईची मोहीम तूर्तास थंडावल्याचा फायदा उठवत पुन्हा प्लास्टिकचा वापर सुरू झाला आहे. यामुळे पर्यावरणाची हानी होत आहे. मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांना दणका देण्याची मोहीम घेण्यात आली होती. मात्र त्यात विधानसभा निवडणुकीमुळे या माहिमेत खोडा पडला. याचा फायदा काही व्यावसायिक व व्यापाऱ्यांनी उठवला असून प्लास्टिक पिशव्यांचे साठे करत सर्रासपणे विक्री केली जात आहे.
शहरातील काही व्यावसायिकांकडे प्लास्टिक पिशव्यांचे साठे करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. बहुतांश विक्रेत्यांकडून ग्राहकांना प्लास्टिक पिशवी उपलब्ध करून दिली जात आहे. यामुळे शहरात प्लास्टिक बंदीचे पुरते तीनतेरा वाजले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिजीत दीपकेंना विचारलं- देशाचा बेस्ट PM कोण? क्षणाचाही विलंब न करता घेतलं 'या' नेत्याचं नाव; बेस्ट CM साठी घेतली तीन नावं

Bidkin News: बिडकीनच्या DMIC हद्दीत अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह; घातपाताचा संशय, पोलिस तपास सुरू

CNG-PNG महागणार? शेणापासून तयार होणाऱ्या CBG ची किंमत वाढली; ग्राहकांच्या खिशावर कसा परिणाम होणार?

Amravati Hospital Fire : निधी नव्हता म्हणून फायर ऑडिटला विलंब, अमरावतीतील रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Court: न्यायसेवेतील प्रदीर्घ अनुभव पुण्याच्या न्यायालयाच्या कामी; अंजू शेंडे यांनी स्वीकारला प्रमुख न्यायाधीशपदाचा पदभार

SCROLL FOR NEXT