कोकण

रत्नागिरी- टुडे पान १ साठी, संक्षिप्त पट्टा

CD

कोतवडे हायस्कूल
वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय
रत्नागिरीः माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढी येथे पतपेढीच्या वर्धापनदिनानिमित्त विजयसिंहराजे पटवर्धन कोतवडे इंग्लिश स्कूलच्या आठवीची विद्यार्थिनी प्रचिती पातये हिने जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला. या निमित्त कोतवडे ग्रामस्थ मंडळाचे उपाध्यक्ष संजय मयेकर, सहसेक्रेटरी नरेश कांबळे, शाळेचे मुख्याध्यापक प्रेमदास पवार व प्रचितीला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका पेडणेकर यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी दत्ताराम लिंगायत, सचिन कोलगे, शरदचंद्र कुंभार, अश्विनी कामतेकर आदी शिक्षक उपस्थित होते. प्रचिती हिचे कोतवडे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.
-------
प्राचीन भारतीय लिपी
परिचय वर्ग उद्‌घाटन
रत्नागिरीः गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या (स्वायत्त) संस्कृत विभागातर्फे आयोजित प्राचीन भारतीय लिपी परिचय वर्गाचे उद्घाटन झाले. या वेळी वर्गाच्या मार्गदर्शिका डॉ. विनया क्षीरसागर, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, कलाशाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी आणि संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये उपस्थित होत्या. डॉ. आठल्ये यांनी हस्तलिखितांचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांच्या मनात जागृत झालेली लिपीविषयक जिज्ञासा शमवण्याच्या हेतूने या लिपीवर्गाचे आयोजन केल्याचे सांगितले. या वर्गासाठी पुणे येथील डेक्कन कॉलेजमध्ये कोषशास्त्र विभागात सहसंपादक म्हणून निवृत्त झालेल्या व उदयपूर येथील धरोहर येथे कार्यरत असणाऱ्या डॉ. विनया क्षीरसागर मार्गदर्शक म्हणून लाभल्या. त्यांनी लिपीमध्ये झालेल्या बदलातून तयार झालेल्या अन्य लिपींविषयी मार्गदर्शन केले.
----------
गोगटे महाविद्यालयात
‘मराठी’वर व्याख्यान
रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात मराठी विभागातर्फे अभिजात मराठी भाषा-नागरिकांची जबाबदारी या विषयावर अखिल भारतीय साहित्य परिषदेचे (कोकण प्रांत) कार्याध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी व्याख्यान दिले. या वेळी कलाशाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, भारतीय इतिहास संकलन समिती कोकण प्रांताचे सचिव चंद्रकांत जोशी उपस्थित होते. देशमुख यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कसा प्राप्त झाला, या संदर्भातील विविध टप्पे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. मराठी भाषेला प्राप्त झालेला अभिजात दर्जा टिकवून ठेवण्यासाठी एक नागरिक म्हणून आपली जबाबदारी काय आहे, यावर प्रश्नोत्तर स्वरूपात चर्चा केली. डॉ. चित्रा गोस्वामी यांनी मराठीच्या प्रचार व प्रसारकार्यात सहभागी झाले पाहिजे तरच मराठी भाषा प्रवाही राहील, असे सांगितले. प्रास्ताविक डॉ. सीमा वीर यांनी केले. व्याख्यानप्रसंगी मराठी विभागप्रमुख डॉ. शिवराज गोपाळे, डॉ. निधी पटवर्धन, संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये, राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. नीलेश पाटील, प्रा. प्रज्ञा भट, भारतीय इतिहास संकलन समिती कोकण प्रांताचे सहसचिव प्रशांत रावदेव, ज्येष्ठ संपादक प्रमोद कोनकर, कला शाखेचे विद्यार्थी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amazon child shopping: आता बोला...! आई-वडील झोपेतच अन् तिकडं त्यांच्या लाडक्या चिमुकल्यानं चक्क 'अमेझॉन'वर केली अडीच लाखांची खरेदी

Mahadev Munde Case: खळबळजनक! '‘महादेव मुंडे खून प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला वाल्मीकने संपवलं’', आकस्मिक मृत्यूचा बनाव

MLA Ramesh Thorat : माजी आमदार रमेश थोरात घड्याळ हाती बांधण्याच्या तयारीत; अशोक पवार मात्र पक्षातच समाधानी

Latest Marathi News Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

MLA Rahul Kul : उजनी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये बुडीत बंधारे उभारावेत; आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

SCROLL FOR NEXT