कोकण

संकेता सावंतची पंच म्हणून निवड

CD

- rat7p2.jpg-
24N30059
संकेता सावंत

तायक्वांदो स्पर्धेसाठी
संकेता सावंत पंच
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ ः गोवा येथे होणाऱ्या चौथ्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून संकेता सावंत यांची पंच म्हणून निवड करण्यात आली आहे. तायक्वांदो असोसिएशन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनाखाली गोवा तायक्वांदो असोसिएशनच्या सहकार्याने तायक्वांदो अॅकॅडमी ऑफ वास्को आयोजित ही स्पर्धा पेडम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स इनडोर स्टेडियम पेडम म्हापसा गोवा येथे तीन दिवस होणार आहे.
खुल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी देशाच्या विविध राज्यातून केलेल्या पंच निवडीमध्ये महाराष्ट्रातून रत्नागिरी जिल्ह्यातील संकेता सावंत हिची निवड करण्यात आली आहे. तिचे अभ्युद्यनगर बहुउद्देशीय सभागृहात स्पोर्ट्स तायक्वांदो असोसिएशनच्या मान्यतेने तायक्वांदो प्रशिक्षण केंद्र सुरू आहे. सर्व मुलामुलींना या ठिकाणी प्रशिक्षणाची संधी उपलब्ध आहे. संकेताची निवड झाल्याबद्दल तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, सचिव मिलिंद पाठारे, खजिनदार व्यंकटेशराव कररा, विश्वदास लोखंडे, सचिव लक्ष्मण कररा, शशांक घडशी, मिलिंद भागवत, शाहरूख शेख, राम कररा, प्रशांत मकवाना यांनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलींसाठी भन्नाट योजना! जन्मानंतर लगेचच ५००० रुपये अन्‌ १८ वर्षे झाल्यावर मिळणार एक लाख एक हजार रुपये, पिवळे, केशरी रेशनकार्डधारक लाभार्थी, वाचा...

आजचे राशिभविष्य - 12 मार्च 2026

अग्रलेख : ‘तेल’ नावाचे वर्तमान

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 12 मार्च 2026

ढिंग टांग : युद्ध गेले चुलीत..!

SCROLL FOR NEXT