Dhing Tang
sakal
चुलीवरचे खाणार त्याला देव देणार, असे म्हटलेच आहे. सांप्रतकाळी ग्यासचे सिलेंडर गायब होण्याचे दिवस आले असताना चुलीचे माहात्म्य पटवून सांगण्याची वेळ आली आहे. काही वर्षांपूर्वी आपल्या कनवाळू पंतप्रधानांनी देशभरातील चुलीवर वांकवांकून रांधणाऱ्या आणि धुराने दृष्टी गमावून बसणाऱ्या माऊल्यांसाठी (एक) ग्यास सिलेंडर मोफत देण्याची योजना आणली. घरोघर ग्यास पेटले, आणि चुली चुलीत गेल्या. आज त्याच चुलींचा जीर्णोद्धार करण्याची वेळ आली आहे.