31346
गावाच्या विकासासाठी सर्वांचा सहभाग महत्त्वाचा
वासुदेव नाईकः कुडाळात ग्रामपंचायत विकास आराखडा कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १३ ः गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन प्रशासक तथा कुडाळ पंचायत समिती गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी ‘आमचा गाव, आमचा विकास’ अंतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा कार्यशाळेत आज केले.
राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान २०२४-२५ अंतर्गत ''आमचा गाव, आमचा विकास'' अंतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्याबाबतच्या मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले होते. येथील महालक्ष्मी सभागृहात प्रशासक तथा गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. याचे उद्घाटन श्री. नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत विस्तार अधिकारी संजय ओरोसकर, आनंद कुंभार, पिंगुळी सरपंच अजय आकेरकर, मास्टर ट्रेनर चंद्रकांत म्हापणकर, आरती पाटील, माजी पंचायत समिती सदस्य अॅड. अनघा तेंडोलकर, महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी संचिता कुडाळकर, उप अभियंता बांधकाम विभाग पुलांगे, लघु पाटबंधारे उपविभाग कुडाळ जलसंधारण अधिकारी मंगेश हवालदार, आरोग्य पर्यवेक्षक धनश्री धनवे, पीआरओ एस. एस. प्रभू, नेरूर सरपंच भक्ती घाडी, माणगाव सरपंच मनीषा भोसले, महादेव खरात, संजय चौकेकर, मयूरी परब, कुडाळ तालुक्यातील सरपंच, खातेप्रमुख, विस्तार अधिकारी आदी उपस्थित होते.
श्री. नाईक म्हणाले, ‘‘गावाचा सर्वांगीण विकास साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून कुडाळ तालुक्यातील गणस्तरीय प्रशिक्षण १९ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. सर्वांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन आपल्या गावाचा विकास कसा साध्य करता येईल० नवनवीन योजना कशा आणता येईल० या दृष्टिकोनातून परिपूर्ण आराखडा तयार करावयाचा आहे.’’
पिंगुळी सरपंच आकेरकर यांनी प्रत्येकाने आपल्या गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यासाठी आराखडा महत्त्वाचा आहे. तो पूर्ण करताना तो परिपूर्ण कसा असावा? त्यामध्ये योजना इतर काही विकास कामे या अनुषंगाने आराखडा असावा व आपल्या गावाचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिने सर्वांनी पावले टाकावीत, असे आवाहन केले. त ट्रेनर म्हापणकर, आरती पाटील यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक मयुरी परब यांनी तर आभार आनंद कुंभार यांनी मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.