कोकण

नफा झाल्याचे भासवून ८ लाखांची फसवणूक

CD

गुतवणुकदाराला आठ लाखांचा गंडा
रत्नागिरीतील प्रकार ; महिलेचा प्रताप, नफा झाल्याचे सांगून कृत्य
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ः कंपनीत गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर ५० लाखांचा नफा झाल्याचे भासवून त्यातील १० टक्के कमिशन आगावू घेऊन ८ लाख ३ हजार ९६९ रुपयांची फसवणूक महिलेने केली. या प्रकरणी संबधित महिलेविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना ४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत श्रीनगर खेडशी, रत्नागिरी येथे घडली. या प्रकरणी सोमवारी (ता. ६) रात्री नऊच्या सुमारास ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
पोलिसांनी दिलेली माहिती, फिर्यादी सुधीर भाऊ सकपाळ यांनी ४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत एका ग्रुपच्या अॅडमिन असलेल्या संशयित महिलेने तिच्या व्हॉटसअॅप नंबरवरून सुधीर सकपाळ यांच्याशी संपर्क केला. त्यांना एका कंपन्यांचे अप्पर सर्कीट, ब्लॉक ट्रेड, एआय ट्रेडिंग, आयपीओ यांची माहिती दिली. या कंपन्यांचे शेअर ट्रेडिंगमध्ये सकपाळ यांना गुंतवणूक करण्यास सांगितले. तिने फिर्यादी यांच्याकडून त्यांच्या बॅंक खात्यावरून एनईएफटी तसेच युपीआयवरून रक्कम ट्रान्स्फर करून घेतली. त्याचबरोबर सकपाळ यांना एक ॲप डाउनलोड करण्यास सांगितले. तिने संबधित कंपनीचा लोगो असलेल्या अॅप्लिकेशनमध्ये सकपाळ यांनी केलेल्या रक्कमेवर त्यांना ५० लाख ४२ हजार ७३८ रुपयांचा नफा झाल्याचे भासवले. कंपनीच्या गंतवणुकीवर झालेला नफा फिर्यादी सकपाळ यांना परत देण्याकरिता संशयित महिलेने सकपाळ यांनी १० टक्के कमिशन आगावू मागवून घेतले. सुधीर सकपाळ यांनी गुंतवणूक केलेली एकूण रक्कम ८ लाख ३ हजार ९६९ रुपये तसेच त्यावर फिर्यादी यांना झालेला नफा न देता सुधीर सकपाळ यांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी फिर्यादी सकपाळ यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अंमलदार करत आहेत.
---
भूलथापांना बळी पडू नका
गुंतवणुकीवर मोठा नफा मिळवून देतो अशी अमिषे दाखविणाऱ्यापासून सावध रहा. विचारपूर्वक गुंतवणूक करा. शंका आल्यास संबधिताविरोधात तातडीने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार द्या असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhishek Banerjee Attack : अभिषेक बॅनर्जींवर जीवघेणा हल्ला; विटा-दगडं फेकत डोळे आणि छातीवर वार, ममता बॅनर्जींचा भाजपवर गंभीर आरोप, म्हणाल्या, सत्ताधारी खुनी...

Pune News: हिंजवडीतील IT कंपनी अचानक बंद? पगार नाही, चेक बाऊन्स... ७०० इंटर्न आणि कर्मचाऱ्यांचा वेतन घोटाळा उघड

Hero New Bike : पेट्रोल पंपावर जायचं विसरा! लॉन्च झाली Hero ची दमदार बाइक; 72km मायलेजसह जबरदस्त स्मार्ट फीचर्स, किंमत फक्त...

Gokul Politics : बंटी पाटलांना टक्कर देण्यासाठी महायुतीचा 'मास्टरस्ट्रोक'! 'गोकुळ'साठी कोरेंची मध्यस्थी अन् चंद्रकांतदादांनी काढला तोडगा, गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?

Akola RSS Office Attack Case: आरएसएस कार्यालय हल्ला प्रकरणात आमदार साजिद खान पठाण यांच्यासह १२ जणांची १६ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

SCROLL FOR NEXT