-rat१०p२.jpg -
२५N३७५९३
देवरूख ः पाटगाव घाटीतील रस्त्याचे रूंदीकरण करण्याची मागणी करणारे निवेदन देताना ग्रामस्थ.
--------
पाटगाव घाटीतील रस्ता रूंदीकरण रखडले
बांधकाम विभागाला निवेदन; २६ला उपोषणाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १० : देवरूख-रत्नागिरी मार्गाचे रूंदीकरण दोन वर्षांपूर्वी पूर्ण करण्यात आले. त्यामुळे देवरूख ते बावनदी (तळेकांटे) हा प्रवास सुकर झाला आहे; परंतु देवरूखपासून जवळच असणाऱ्या पाटगाव घाटीतील सुमारे ५०० मीटर रस्त्याचे रूंदीकरण न करता तो तशाच अवस्थेत सोडून देण्यात आला. या अरूंद रस्त्यावर अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. तिथे झालेल्या अपघातात आतापर्यंत दोघांना जीवही गमवावा लागला आहे.
देवरूख-रत्नागिरी मार्गावरील पाटगाव घाटीतील त्या धोकादायक ठिकाणाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करून त्या रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी देवरूखवासियांनी केली आहे. याबाबत संगमेश्वर तालुक्याच्या आमसभेत आमदार शेखर निकम यांनी संबंधित विभागाला पाटगाव येथील विषयावर गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना केल्या होत्या; परंतु याबाबत कोणतीही हालचाल न करता सार्वजनिक बांधकाम फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत. त्यामुळे वाहनचालकांच्या जीवाशी खेळच सुरू आहे. याच मार्गावरील सुमारे १० गावातील ग्रामस्थ आता आक्रमक झाले असून, त्यांनी बांधकाम विभागाला निवेदन दिले आहे. २६ जानेवारीपर्यंत या रस्त्याबद्दल ठोस निर्णय न झाल्यास प्रजासत्ताक दिनी १० गावातील ग्रामस्थ, बांधकाम विभागातील ग्रामस्थ उपोषणास बसतील, असा इशारा दिला आहे. निवेदन देताना वैभव सुर्वे, संतोष जाधव, तेजस शिंदे, विनोद माने, समीर चाळके, बावा चाळके, परिमल चाळके, बाबू पेडणेकर, राजा पेडणेकर, रवी चाळके, प्रतीक चाळके, संमेश चाळके, सचिन सावंत, नागेश चाळके यांच्यासह दहा गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.