कोकण

चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाचे स्नेहसंमेलन

CD

चांद्रसेनीय कायस्थ प्रभू
समाजाचे स्नेहसंमेलन
चिपळूण ः चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज रत्नागिरी जिल्ह्याचे द्वितीय स्नेहसंमेलन खेड येथील एका हॉटेलमध्ये उत्साहात झाले. या ठिकाणी मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, रत्नागिरी या तालुक्यातील ज्ञाती बांधव उपस्थित होते. अखिल भारतीय चांद्रसेनीय कायस्थ प्रभू मध्यवर्ती संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष समीर गुप्ते, उपाध्यक्ष चंद्रशेखर देशपांडे, सचिव रामानंद सुळे, विश्वस्त नागेश कुळकर्णी, क्रांतीकुमार कुळकर्णी, कमिटी सदस्य श्रीकृष्ण चित्रे, गौरी राजे, गिरिष गडकरी आदी या संमेलनात सहभागी झाले होते. हे संमेलन यशस्वी होण्यासाठी संस्थापक जिल्हाध्यक्ष सुनील शरद, सौरभ चिटणीस, सुदीप गुप्ते, स्वाती गुप्ते, शिवानी प्रधान, उदय देशपांडे यांनी परिश्रम घेतले. या वेळी देवेंद्र भुजबळ यांनी समाजाशी आपली बांधिलकी या विषयावर विचार मांडले.
---
वन्यजीवांचे संरक्षणावर
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
चिपळूण : न्यू इंग्लिश स्कूल पोफळी प्रशालेमध्ये जागतिक वन्यजीव दिन साजरा करण्यात आला. या वेळी चिपळूण वनविभागाचे वनपाल महेंद्र सावंत, रामपूरचे वनरक्षक संदेश शिंदे, कोळकेवाडीचे वनरक्षक आदित्य गुंठे, पोफळी ग्रामपंचायत सदस्य व संजय बामणे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला क्रीडाशिक्षक, विज्ञानशिक्षक व समुपदेशक यादव यांनी मान्यवरांचे स्वागत केले. वन्यजीव दिनाचे औचित्य साधून सावंत यांनी वन्यजीवांचे संरक्षण करण्याविषयी त्याचबरोबर पर्यावरणामधील अन्नसाखळी कशी संरक्षित करता येईल, वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ची कलमे सांगून विद्यार्थ्यांनी वन्यजीवाप्रती आदर, प्रेमभाव व्यक्त करावा अशी माहिती दिली. शिंदे यांनी वन्यजीवांचे पर्यावरणावरील महत्त्व गोष्टीरूप उदाहरण सांगून पटवून दिले. त्याचबरोबर स्लाईड शोच्या माध्यमातून वन्यजीवांची माहिती देण्यात आली. वन्यजीवांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, याचीही माहिती देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: एप्रिल महिन्यात सोन्याच्या भावात मोठा बदल! अक्षय तृतीयेआधी बाजारात उलटफेर; जाणून घ्या आजचा भाव

विधान परिषदेच्या १७ जागांवर लवकरच निवडणूक, तर ९ सदस्यांचा कार्यकाळ संपणार; कुणाला किती जागा मिळणार?

Japanese Encephalitis: जपानी मेंदूज्वराविरोधात राज्य सरकार सतर्क; लसीकरण मोहिमेवर विशेष भर, आजारावर प्रभावी नियंत्रण आवश्यक!

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत उष्माघाताचा पहिला बळी; ४०°C तापमानामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Jalgaon Crime : लेकीच्या मानेवरच्या जखमांनी आईचे काळीज चिरले! हात स्कार्फने बांधून 17 वर्षीय मुलीवर अत्याचार; हुंदके देत पीडितेने सांगितली 'आपबीती'

SCROLL FOR NEXT