परब समाजाची आज ओरोस येथे बैठक
कुडाळ ः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परब मराठा समाज बांधवांसाठी व्यवसाय, शिक्षण आणि स्पर्धात्मक युगात उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी होणाऱ्या सांस्कृतिक मंडळाची स्थापना करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त परब बांधवांनी एकत्र यावे, असे आवाहनही आयोजकांनी केले आहे. परब मराठा समाजातील तरुण, विद्यार्थी वर्ग यांचे व्यवसाय, शिक्षण आणि स्पर्धात्मक युगात उज्ज्वल भविष्य घडावे, या उदात्त हेतूने उद्या (ता. २७) दुपारी ३.३० वाजता ओरोस येथील इच्छापूर्ती गोविंद मंगल कार्यालयात येथे परब मराठा समाज सिंधुदुर्गची तातडीची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत परब मराठा समाज सिंधुदुर्ग सांस्कृतिक मंडळाची स्थापना करण्यात येणार आहे. सिंधुदुर्गातील परब मराठा समाज बांधवांनी बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
.....................
रेडी कुळकार देवाचा
उद्या वर्धापन दिन
सावंतवाडी ः रेडी-गावतळेवाडी येथील श्री देव कुळकार मंदिराचा वर्धापन दिन सोहळा व श्री देवी माऊली पालखी व बारा पंचायतन देवतांची भेट यांची आठवण म्हणून सोमवारी (ता. २८) धार्मिक सोहळ्याचे आयोजन केले आहे. यानिमित्त सकाळी धार्मिक विधी, श्रींची महापूजा, दुपारी आरती, १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता भजने, रात्री ९ वाजता दत्त माऊली दशावतार नाट्यमंडळाचे नाटक होणार आहे. उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
.....................
माजगाव-चिपटेवाडीत
आज दशावतार नाटक
ओटवणे ः माजगाव चिपटेवाडी येथे उद्या (ता. २७) रात्री १० वाजता बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्य मंडळ (कवठी -कुडाळ) यांच्या नाट्यप्रयोगाचे आयोजन केले आहे. नाट्य रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ब्राह्मण इस्वटी कला क्रीडा मित्रमंडळाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.