IPL 2026: हार्दिक पांड्या CSK कडून खेळणार? '०७:०७' पोस्ट अन् Mumbai Indians चा कॅप्टनची चर्चा... नेमकी भानगड काय?

Hardik Pandya CSK transfer rumours latest update: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ संपत आली असतानाच सोशल मीडियावर एक नवा चर्चेचा विषय रंगला आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या पुढील हंगामात Chennai Super Kings संघाकडून खेळणार का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
Hardik Pandya and Suryakumar Yadav are likely to miss the IPL 2026 clash.

Hardik Pandya and Suryakumar Yadav are likely to miss the IPL 2026 clash.

esakal

Updated on

Why is Hardik Pandya linked with Chennai Super Kings in IPL 2026? गुजरात टायटन्सविरुद्धचा साखळी फेरीतील शेवटचा सामना गमावल्यामुळे चेन्नई सुपर किंग्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला. पायचवेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या CSK ला सलग तिसऱ्या हंगामात साखळी फेरीच्या पुढे मजल मारता आलेली नाही. तेच दुसरीकडे मुंबई इंडियन्सलाही मागील तीन हंगामात चांगली कामगिरी करता आलेली नाही. राजस्थान रॉयल्सकडून शेवटच्या साखळी सामन्यात हार पत्करल्यानंतर कर्णधार हार्दिकने एक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली. ज्यामुळे तो पुढील वर्षी या फ्रँचायझीसोबत राहणार नाही, अशी चर्चा सुरू झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com