- rat२९p१.jpg
60624
नितीन ढेरे, मिलिंद कदम, प्रकाश झोरे, दीपक ओतारी, राजेंद्र सावंत, दिनेश आखाडे, संजय मुरकर, सोनाली शिंदे.
१५ पोलिस कर्मचाऱ्यांना महासंचालक पदक
समर्पित सेवेची घेतली दखल ; १ मे रोजी गौरव
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, २९ : महाराष्ट्र पोलिस दलातील उत्कृष्ट कामगिरी आणि समर्पित सेवेसाठी जिल्हा पोलिस दलातील १५ अधिकारी आणि अंमलदारांना पोलिस महासंचालक पदक जाहीर झाले आहे. १ मे रोजी हे सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात येणार आहे. हे सन्मानचिन्ह त्यांच्या कर्तव्यनिष्ठा आणि समाजसेवेचा गौरव ठरले आहे.
विशेष सेवा आणि दीर्घकालीन योगदान यंदाच्या सन्मानचिन्ह प्राप्तकर्त्यांमध्ये प्रवर्ग-१० अंतर्गत विशेष सेवेसाठी रत्नागिरी पोलिस मुख्यालयातील पोलिस हवालदार नितीन डोळस यांचा समावेश आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तसेच प्रवर्ग-८ अंतर्गत १५ वर्षांच्या समर्पित सेवेसाठी खालील १४ जणांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक नितीन ढेरे, सहाय्यक पोलिस फौजदार सुधाकर रहाटे, महामार्ग पोलिस मदत केंद्र कशेडी, सहाय्यक पोलिस फौजदार महामार्ग पोलिस मदत केंद्र, हातखंबा येथील संजय मुरकर, सहाय्यक पोलिस फौजदार देवरूख पोलिस ठाण्याचे दीपक पवार, शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस फौजदार राजेंद्र सावंत, रत्नागिरी जिल्हा वाहतूक शाखेचे पोलिस हवालदार दिनेश आखाडे, महामार्ग पोलिस मदत केंद्र कशेडीतील हवालदार विजय मोरे, पूर्णगड पोलिस ठाण्याचे हवालदार प्रकाश झोरे, महिला पोलिस हवालदार सोनाली शिंदे, अलोरे पोलिस ठाण्याचे हवालदार दीपक ओतारी, जयगड पोलिस ठाण्याचे हवालदार मिलिंद कदम, चिपळूण पोलिस ठाण्याचे हवालदार प्रितेश शिंदे, दापोली पोलिस ठाण्याचे हवालदार संतोष सडकर, पूर्णगड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस फौजदार महेश सावंत, पूर्णगड पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार महेश मुरकर यांचा समावेश आहे.
-------
कोट
अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्यनिष्ठेने आणि सेवाभावाने समाजात सुरक्षा आणि विश्वास निर्माण केला आहे. रत्नागिरी पोलिसदलाने नेहमीच आपल्या कार्यक्षमतेने आणि कर्तव्यदक्षतेने समाजात आदर्श निर्माण केला आहे. या सन्मानचिन्हाने जिल्ह्यातील पोलिसदलाच्या कार्याचा गौरव झाला.
- धनंजय कुलकर्णी, जिल्हा पोलिस अधीक्षक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.