कोकण

शिवरायांनी दाखवून दिला खरा कर्मयोग

CD

संतांचे संगती ........लोगो
(२४ एप्रिल टुडे ३)
जय जय महाराष्ट्र माझा
आज एक मे महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस! या निमित्ताने थोडे महाराष्ट्रातील संतपरंपरा या विषयाचे चिंतन करूया. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हणाले, ‘या महाराष्ट्रातील कुठलेही ढेकूळ उचला आणि पाण्यात टाका तवंग येईल तो रक्ताचा, इतिहासाचा!’ याच धर्तीवर मला वाटते, महाराष्ट्रातील कुठलीही माती उचला आणि वास घ्या. वास येईल तो अबीर बुक्क्याचा...

- rat३०p१.jpg-
25N60854
- धनंजय चितळे, चिपळूण
----
छत्रपती शिवरायांनी
दाखवून दिला खरा कर्मयोग

मराठी मुलखात परमार्थाची मोठी प्रदीर्घ आणि समृद्ध परंपरा आढळते. या राज्यातील एकही जिल्हा असा नसेल की, जिथे संत झाले नाहीत. ज्ञानदेवांपासून सुरू झालेल्या वारकरी परंपरेतील संतांचे वर्णन करताना श्री तुकाराम महाराजांच्या शिष्या बहीणाबाई यांनी म्हटले आहे,
संतकृपा झाली इमारत फळा आली।।
ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया।।
नामा तयाचा किंकर तेणे रचिले ते आवार।।
जनार्दन एकनाथ खांब दिधला भागवत।।
तुका झालासे कळस भजन करा सावकाश।।
बहेणी फडकती ध्वजा निरूपण आले ओजा।।

श्री समर्थ रामदासस्वामी यांची रामदासी परंपरा, मोरया गोसावी यांचा गाणपत्य संप्रदाय, श्री अक्कलकोट स्वामी समर्थ परंपरा, दत्त संप्रदायसारख्या अनेक परंपरांनी महाराष्ट्रावर शुद्ध परमार्थाचे उत्तम संस्कार केले आहेत.
माझा मराठाची बोल कौतुके ।
परि अमृतातेही पैजा जिंके ।
ऐसी अक्षरे रसिके ।मेळवीन।।
असे म्हणत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीमद्भगवद्गीता मराठीत आणली. वामनपंडितांनी यथार्थ दीपिका या ग्रंथात गीतेचा भावानुवाद केला. श्री एकनाथ महाराजांनी श्री मद्भागवत ग्रंथातील तत्त्वज्ञान एकनाथी भागवतातून मराठीत आणले. आपल्या आचरणाने परमार्थ कसा साधावा हे जगाला त्यांनी दाखवून दिले. प्राचीन काळातील संतांप्रमाणेच श्री गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांसारख्या महान संतांनी महाराष्ट्रात भक्तीमार्गाला समाजकार्याची जोड दिली आहे. देशसेवेबरोबरच ईशसेवेची कास धरा, हा उपदेश संत आवर्जून करतात. आजच्या काळातही महाराष्ट्रात अनेक महात्मे परमार्थ प्रबोधनाचे कार्य निरपेक्ष भावनेने निरलस वृत्तीने करत आहेत. हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा, अशा भावनेने कार्य करणारे छत्रपती शिवाजी महाराज हेच आपले आराध्य दैवत आहे. श्री छत्रपती शिवरायांनी राज्य करताना माझे असे न म्हणता ते परमेश्वरी कार्य म्हणून केले. साडेतीनशे किल्ल्यांपैकी फक्त रायगडावर नाममुद्रा आणि सिंधुदुर्ग किल्ल्यावर हात आणि पायांचा ठसा उमटवला. बाकी कुठल्याही किल्ल्यावर आपली आठवण ठेवली नाही, हीच खरी परमार्थ वृत्ती आहे. खरा कर्मयोग काय असतो आणि तो कसा आचरावा, यांचा वस्तूपाठच श्री छत्रपतींनी आपल्या जीवनातून घालून दिला आहे. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतानाच आपणा सर्वांना एकच विनवणी आहे की, आपल्या मराठी भाषेइतके समृद्ध संतवाङ्मय अन्य भाषांत नाही. आपण भाग्यवान आहोत म्हणून आपल्याला मराठी मुलुखात जन्म लाभला आहे.
इये मराठीचिये नगरी । ब्रह्मविद्येचा सुकाळू करी।
असे म्हणत, श्री ज्ञानदेवादी संतांनी दिलेले हे अक्षर अभंग वाङ्मय आपण वाचूया आणि आपल्या पुढच्या पिढीला तो अध्ययनाचा वसा देऊया.

(लेखक संत आणि संस्कृतीचे अभ्यासक आहेत.)
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Yadav Murder Caseराधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

Record Breaking : १० चौकार, १२ षटकार! ३५३ च्या स्ट्राईक रेटने शतक; ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भीमपराक्रम, २९ धावांत ९ गेल्या तरी संघ जिंकला

Latest Marathi News Updates : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लखनौमधील बडी काली मंदिराला दिली भेट

SCROLL FOR NEXT