कोकण

अमली पदार्थाचे दुष्परीणाम वेळीच समजावून सांगा

CD

- rat८p७.jpg-
P२५N६२५१५
संगमेश्वर ः पोलिस उपअधीक्षक शिवप्रसाद पारवे मार्गदर्शन करताना.
- rat८p८.jpg-
२५N६२५१६
कडवईतील ग्रामस्थ.
---
अमली पदार्थाचे दुष्परिणाम मुलांना वेळीच समजावून सांगा
शिवप्रसाद पारवे ः कडव‌ईत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ८ ः वयात येणाऱ्या तरुण पिढीला अमली पदार्थांचे घातक दुष्परिणाम प्रत्येक पालकांनी वेळीच आपल्या मुलांना समजावून सांगावेत आणि त्यांना सावध करावे, असे प्रतिपादन पोलिस उपअधीक्षक शिवप्रसाद पारवे यांनी केले.
कडव‌ई महाराष्ट्र उर्दू हायस्कूल येथील एज्युकेशन सोसायटी आणि संगमेश्वर पोलिस ठाण्याच्या संयुक्त विद्यमाने अमली पदार्थ, ड्रग, गांजा सेवनामुळे होणारे दुष्परिणाम यावर मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, दिवसेंदिवस वेगवेगळ्या गुन्हेगारी क्षेत्रात वाढ होत आहे. त्यात विशेषतः तरुण पिढी बळी पडते. अमली पदार्थांसारख्या गोष्टी सेवन करण्याकडे तरुण पिढीचा कल वाढतो. गांजा, ड्रग्ज, गुटखा अशा विनाशकारी पदार्थांमुळे मानवी जीवन उद्ध्वस्त होते. भरमसाट व दामदुप्पट किंमतीने चोरट्या स्वरूपात अमली पदार्थ विकत घेऊन तरुण मंडळींना दिले जातात. व्यसनामुळे व्यक्तीचे आयुष्य उद्ध्वस्त होते. संगमेश्वर पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष, अल्पावधीत कार्याची छाप उमटवलेले संगमेश्वर पोलिस ठाण्यामधील माझे सहकारी पोलिस पथकाच्या सहकार्यानेच मार्गदर्शन उपक्रम राबवत आहेत. गुन्हेगारांना शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.
या मार्गदर्शन कार्यक्रमासाठी मनसे जिल्हाप्रमुख जितेंद्र चव्हाण, उपसरपंच दत्ताराम ओकटे, एज्युकेशन सोसायटी कडव‌ईचे उपाध्यक्ष अन्सार जुवळे, मुख्याध्यापक रिजवान कारीगर, मुख्याध्यापक प्रांजल मोहिते, कडवई रिक्षा संघटना अध्यक्ष मिलिंद चव्हाण, पोलिस पाटील संजय ओकटे, पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत कांबळे, पोलिस हेडकॉन्स्टेबल सचिन कामेरकर, विनय मनवळ, कुणाल घोलप, सेवाभावी चंद्रकांत जाधव आदी उपस्थित होते.
---
उदरनिर्वाहासाठी लघुद्योग करा
अमली पदार्थ चोरून विकण्याचा व्यवसाय कोणीही करू नये. या धंद्यात पैसा अमाप मिळाला तरीही कोणीही विक्रेता कुटुंबात समाधानी व सुखी कधीच होऊ शकत नाही, हे वास्तव आहे. कायम भीतीच्या ओझ्याखाली वावरून गुन्हेगार म्हणून कधीतरी वेळ भरत असते. गैर व चुकीचे तसेच तरुण पिढीला बरबाद व उद्ध्वस्त करणारे व्यवसाय बंद करून उदरनिर्वाहासाठी छोटे छोटे चांगले व्यवसाय करा, असे आवाहनही पारवे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivli west Building incident : मोठी बातमी! डोंबिवली पश्चिमेतील 25 कुटुंब राहत असलेली चार मजली इमारत खचली!

Rahul Gandhi and Mallikarjun Kharge: ...म्हणून यंदा राहुल गांधी अन् खर्गे लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला गेले नाहीत!

Lionel Messi चा तीन दिवसीय भारत दौरा, मुंबईत वानखेडेसह ब्रेबॉनवरही खेळणार, कधी आणि केव्हा? वाचा संपूर्ण वेळापत्रक

Love Jihad : हैदाराबादेत 'लव्ह जिहाद'चं प्रकरण उघडकीस; मूळचा पाकिस्तानी असणाऱ्या भामट्याने हिंदू मुलीला फसवलं अन्...

Maharashtra Rain Alert: पुढील दिवस महत्त्वाचे! मुंबईला मुसळधारेचा इशारा, महाराष्ट्रात कसे असेल हवामान?

SCROLL FOR NEXT