कोकण

आजी-माजी सैनिकांचे प्रश्न सोडवू

CD

62587

आजी-माजी सैनिकांचे प्रश्न सोडवू
नीलेश राणेः शिवापूर येथे रणस्तंभाचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
माणगाव, ता. ८ः बंद असलेली सैनिक भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. तसेच आजी-माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार नीलेश राणे यांनी शिवापूर येथील कार्यक्रमात दिली. 
देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या शिवापूर गावच्या शहीद सुपुत्रांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधण्यात आलेल्या रणस्तंभाचा उद्घाटन सोहळा आज शिवापूर ग्रामपंचायत येथे आमदार नीलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी जिल्हा सैनिक अधिकारी उमेश आईरे, कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे, माजी सैनिक संघटनेचे शिवराम जोशी, विष्णू ताम्हाणेकर, बाबुराव कविटकर  आदी उपस्थित होते. 
आमदार राणे म्हणाले, "देशात आज युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सैनिक देशासाठी किती महत्त्वाचा आहे, ते आज अधोरेखित झाले आहे. शिवापूरसारख्या गावातील दहा सुपुत्र देशासाठी हुतात्मा होतात, ही बाब त्यांच्या कुटुंबियांसाठी, गावासाठी आणि देशासाठी अभिमानास्पद आहे. शिवापूर-शिरशिंगे रस्त्याचे काम लवकरच सुरू होईल. आंजिवडे घाटरस्त्यासाठी प्रयत्न केले जातील. सैनिकांसाठी बंद असलेले कॅन्टीन पुन्हा सुरू केले जाईल. पंचक्रोशीतील विजेचा प्रश्नही लवकरच निकाली काढला जाईल."
यावेळी रणस्तंभाचे व पंचक्रोशीतील विविध विकासकामांचे उद्घाटन तसेच भूमिपूजन ऑनलाईन पध्दतीने आमदार राणे यांच्या हस्ते कळ दाबून करण्यात आले. रणस्तंभासाठी लागणारी शेड आमदार निधीतून उभारण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. या कार्यक्रमानिमित्त १५० माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्या सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. शहीद झालेल्या दहा सैनिक कुटुंबातील व्यक्तींचा सत्कार आमदार राणे यांच्या हस्ते करण्यात आला. रणस्तंभासाठी जमीन देणाऱे सुरेश नाईक यांचाही सत्कार आमदार राणे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक माजी सभापती मोहन सावंत यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi Speech Live Update : पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, देशाला करणार संबोधित

Independence Day 2025 : पंतप्रधान मोदींचे राजघाटावर महात्मा गांधींना अभिवादन, लाल किल्ल्यावर बाराव्यांदा तिरंगा फडकवणार

Solapur Monsoon Update: साेलापुरला मुसळधार पावसाचा इशारा! 'हिप्परगा तलाव फुल्ल, प्रवाह मंदावला'; सांडव्यातून ४०० क्युसेकचा विसर्ग

Child Daycare Tip: मुलांना डे-केअरमध्ये पाठवताय? तर पालकांनी ह्या प्रकारे घ्या सुरक्षेची काळजी

वेतन अधीक्षकांचे आदेश! ‘ही’ कागदपत्रे नसलेल्या शिक्षकांचा थांबणार पगार; ऑगस्टच्या पगारबिलासोबत मुख्याध्यापकांना जोडावी लागणार सर्वांची कागदपत्रे अपलोड केल्याची प्रत

SCROLL FOR NEXT