
Summary
भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन देशभरात उत्साहात साजरा होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून सलग १२व्यांदा तिरंगा फडकला
यावर्षीची स्वातंत्र्यदिन थीम ‘न्यू इंडिया’ असून पंतप्रधानांच्या भाषणात राष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक विकास आणि कल्याणकारी योजना यांवर भर राहणार आहे.
लाल किल्ला परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था, ११,००० हून अधिक सुरक्षा कर्मचारी आणि हवामान विभागाकडून ढगाळ हवामानाचा अंदाज जाहीर.
भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन देशभरात उत्साहात साजरा होत आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील राजघाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून तिरंगा फडकावला. पंतप्रधान मोदींनी सलग १२ व्या वेळी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून ध्वजारोहण केले पंतप्रधान मोदी सकाळी ७:३० वाजता राष्ट्रध्वज फडकवला आणि त्यानंतर देशाला संबोधित केले.