कोकण

-सदर-थोडक्यात समजावून घेऊया कॉम्प्युटर सबोटाज

CD

सावध ऐका सायबरच्या हाका............ लोगो
(१३ एप्रिल पान ६)
कॉम्प्युटर सबोटाज म्हणजे संगणक प्रणाली, नेटवर्क किंवा त्यामधील माहिती यांना जाणीवपूर्वक हानी पोहोचवणे. जसे एखादा व्यक्ती मशिन मोडतो किंवा एखाद्या इमारतीमध्ये घुसतो तसंच डिजिटल जगात संगणकांना नुकसान पोहोचवणे म्हणजेच कॉम्प्युटर सबोटाज. कॉम्प्युटर सबोटाज अनेकप्रकारे होऊ शकतो. उदाहरणार्थ, एखादा व्हायरस संगणकावर टाकून फायली डिलीट करणे, संगणक संथ करणे किंवा पूर्णपणे क्रॅश करणे. कधी-कधी हॅकर्स प्रणालीमध्ये घुसून सेटिंग्ज बदलतात, वेबसाईट बंद करतात किंवा वापरकर्त्यांचे पासवर्ड चोरतात. कधी हे काम काही सेकंदात होते आणि मोठ्या कंपनींचे लाखो रुपये वाया जातात. हे कसं घडतं थोडे समजावून घेऊया.

-rat१०p४.jpg-
25N62868
-प्रा. प्रतीक ओक, चिपळूण
----
थोडक्यात समजावून घेऊया
कॉम्प्युटर सबोटाज
कॉम्प्युटर सबोटाज हा प्रकार कुणीही करू शकतो – एक बाहेरील हॅकर, एक असंतुष्ट कर्मचारी किंवा एखादा प्रशिक्षित गुन्हेगार. आतल्या लोकांनी केल्यास तो धोका अधिक वाढतो कारण, त्यांना आधीपासूनच सिस्टिमचा प्रवेश आणि माहिती असते.
कॉम्प्युटर सबोटाज करण्यामागे अनेक कारणं असतात:
राग/बदला – एखादा कर्मचारी कंपनीवर राग काढतो
पैशासाठी – सायबर गुन्हेगार माहिती चोरून पैसे कमवतात
स्पर्धा – एखादी कंपनी दुसऱ्या कंपनीला मागे टाकण्यासाठी हे करते (अवैध)
मनोरंजन किंवा प्रसिद्धी – काही हॅकर्स केवळ आपली कुवत दाखवण्यासाठी हे करतात

कॉम्प्युटर सबोटाजचे प्रकार
व्हायरस आणि मालवेअर – संगणक बिघडवणारे सॉफ्टवेअर.
‘व्हायरस’ हा शब्द आपण खूपदा ऐकतो; पण ‘मालवेअर’ म्हणजे नक्की काय ते मुद्दाम जाणून घेऊ.
मालवेअर (Malware) म्हणजे सर्व प्रकारच्या हानिकारक सॉफ्टवेअरचा गट आहे. यात वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर असतात जे संगणकाला त्रास देतात, माहिती चोरतात किंवा प्रणाली बिघडवतात. उदाहरणार्थ, कल्पना करा, ‘मालवेअर’ म्हणजे एक गुन्हेगार टोळी आहे. या टोळीत वेगवेगळ्या कामांसाठी सदस्य असतात.
व्हायरस – दुसऱ्यांच्या घरात घुसून सर्वत्र आपली प्रतिकृती बनवणारा.
रॅन्समवेअर – एखाद्याच्या घरात जाऊन सामान लॉक करून ठेवतो आणि पैसे मागतो.
स्पायवेअर – गुपचूप घरात शिरतो आणि सगळी माहिती चोरतो.
ट्रोजन – चांगल्या व्यक्तीसारखा भासवून घरात प्रवेश करतो आणि मग नुकसान करतो.
थोडक्यात मालवेअर म्हणजे ‘सगळ्या वाईट सॉफ्टवेअरचा गट’ आणि व्हायरस म्हणजे त्यातील एक विशिष्ट प्रकार.
फिशिंग अटॅक – बनावट ई-मेलद्वारे पासवर्ड घेणे. डिनायल ऑफ सर्व्हिस (DoS) अॅटॅक – वेबसाईट क्रॅश करणे.
डाटा चोरी किंवा नाश – फायली डिलीट करणे किंवा चोरणे. प्रणालीमध्ये छेडछाड – परवानगीशिवाय बदल करणे.
हे टाळण्यासाठी आपल्या संगणकाचं रक्षण करणं तितकंच गरजेचं आहे. जितकं आपण आपल्या घराचं करतो. पुढे काही सोपे उपाय दिले आहेत- मजबूत व अद्वितीय पासवर्ड वापरणे, अँटीव्हायरस व फायरवॉल सॉफ्टवेअर वापरणे, सॉफ्टवेअर अपडेट करत राहणे, संशयास्पद ई-मेल किंवा लिंक्सवर क्लिक न करणे, महत्वाची माहिती बॅकअप् घेणे.
कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना सायबर सुरक्षिततेबद्दल जागरूक करत असतात आणि कोणत्या प्रणालीला कोण प्रवेश किंवा वापर करू शकतो याचे नियंत्रण ठेवतात; पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रत्येक व्यक्तीने आपल्या कॉम्प्युटरला सुरक्षित कसे ठेवतात याबद्दल जागरूक असणे आणि योग्य माहिती घेणे अत्यंत गरजेचे आहे.
कॉम्प्युटर सबोटाज ही आधुनिक जगातली गंभीर समस्या आहे. हे केवळ आर्थिक नुकसानच करत नाही तर कंपनीची विश्वासार्हता आणि नावसुद्धा बिघडवू शकते; पण थोडी काळजी घेतली तर आपण अशा संकटांपासून स्वतःचा आणि आपल्या संस्थेचा बचाव करू शकतो. संगणक सुरक्षित ठेवणं म्हणजे आपल्या माहितीचं आणि भविष्यासाठीच्या संधींचं संरक्षण करणं होय.

(लेखक एआयएमएल (AIML) विभाग, घरडा अभियांत्रिकी महाविद्यालय, लवेल येथे प्राध्यापक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivli west Building : मोठी बातमी! डोंबिवली पश्चिमेतील 25 कुटुंब राहत असलेली चार मजली इमारत खचली!

Rahul Gandhi and Mallikarjun Kharge: ...म्हणून यंदा राहुल गांधी अन् खर्गे लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला गेले नाहीत!

Lionel Messi चा तीन दिवसीय भारत दौरा, मुंबईत वानखेडेसह ब्रेबॉनवरही खेळणार, कधी आणि केव्हा? वाचा संपूर्ण वेळापत्रक

Love Jihad : हैदाराबादेत 'लव्ह जिहाद'चं प्रकरण उघडकीस; मूळचा पाकिस्तानी असणाऱ्या भामट्याने हिंदू मुलीला फसवलं अन्...

Maharashtra Rain Alert: पुढील दिवस महत्त्वाचे! मुंबईला मुसळधारेचा इशारा, महाराष्ट्रात कसे असेल हवामान?

SCROLL FOR NEXT