कोकण

महावितरणच्या संचालकपदी सचिन तालेवार रूजू

CD

महावितरणच्या संचालकपदी
सचिन तालेवार रूजू
कणकवली, ता. ११ः महावितरण कंपनीचे प्रकल्प संचालक म्हणून सचिन तालेवार यांनी कार्यभार स्वीकारला आहे. त्यांची या पदावर थेट भरती प्रक्रियेतून निवड झाली आहे. याआधी ते इंदूर येथील मध्यप्रदेश पश्चिम क्षेत्र विद्युत वितरण कंपनीचे तांत्रिक संचालक म्हणून कार्यरत होते. श्री. तालेवार गेल्या २८ वर्षांपासून महावितरणमध्ये विविध पदांवर कार्यरत आहेत.
नवनियुक्त संचालक श्री. तालेवार मूळचे नागपूर जिल्ह्याचे असून त्यांचे शालेय शिक्षण छिंदवाडा (मध्यप्रदेश) येथे झाले आहे. विद्युत अभियांत्रिकी पदवी संपादन केल्यानंतर श्री. तालेवार १९९७ मध्ये तत्कालिन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून चंद्रपूर येथे रूजू झाले. पदोन्नतीने सहायक अभियंता म्हणून कार्यरत असताना सन २००६ मध्ये सरळ सेवा भरतीद्वारे त्यांची कार्यकारी अभियंता म्हणून निवड झाली. या पदावर त्यांनी वर्धा, नागपूर व जालना येथे काम केले आहे.
दरम्यान महावितरणकडून त्यांची गूडगाव येथील मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटमधील (एमडीआय) एनर्जी मॅनेजमेंटच्या पोस्ट ग्रॅज्यूएशन डिप्लोमा इन बिझीनेस मॅनेजमेंट (पीजीडीएम) अभ्यासक्रमासाठी निवड झाली होती. सन २००७-०८ मध्ये हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यानंतर सन २०१६ मध्ये झालेल्या सरळसेवा भरतीमध्ये श्री. सचिन तालेवार यांची अधीक्षक अभियंता म्हणून निवड झाली. या पदावर लातूर येथे काम केले. तर सन २०१८ मध्ये सरळसेवा भरतीद्वारे त्यांची मुख्य अभियंता म्हणून निवड झाली. पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून त्यांनी जून २०१८ ते डिसेंबर २०२२ पर्यंत काम केले. बदलीद्वारे छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून कार्यरत असताना मे २०२३ मध्ये श्री. तालेवार यांची इंदूर येथील मध्यप्रदेश पश्चिम क्षेत्र विद्युत वितरण कंपनीचे संचालक (तांत्रिक) म्हणून निवड झाली. या कंपनीत ते दोन वर्षांपासून कार्यरत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi Speech Live Update : पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, देशाला करणार संबोधित

Independence Day 2025 : पंतप्रधान मोदींचे राजघाटावर महात्मा गांधींना अभिवादन, लाल किल्ल्यावर बाराव्यांदा तिरंगा फडकवणार

Solapur Monsoon Update: साेलापुरला मुसळधार पावसाचा इशारा! 'हिप्परगा तलाव फुल्ल, प्रवाह मंदावला'; सांडव्यातून ४०० क्युसेकचा विसर्ग

Child Daycare Tip: मुलांना डे-केअरमध्ये पाठवताय? तर पालकांनी ह्या प्रकारे घ्या सुरक्षेची काळजी

वेतन अधीक्षकांचे आदेश! ‘ही’ कागदपत्रे नसलेल्या शिक्षकांचा थांबणार पगार; ऑगस्टच्या पगारबिलासोबत मुख्याध्यापकांना जोडावी लागणार सर्वांची कागदपत्रे अपलोड केल्याची प्रत

SCROLL FOR NEXT