कोकण

रायगडावरील धनगर वस्तीला हटविल्यास आंदोलन ः पवार

CD

रायगडावरील धनगर वस्तीला
हटविल्यास आंदोलन ः पवार
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ११ः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगडावर शासनाने कित्येक वर्षे वस्ती असणाऱ्या धनगर वस्तीला हटविल्यास त्यांना न्याय देण्यासाठी शिवाजी महाराजांचे हजारो मावळे आंदोलन करतील, असा इशारा शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती रायगड किल्ले अध्यक्ष सुनील पवार यांनी दिला. रायगडच्या सर्वांगीण विकासात धनगर व गवळी समाजाचा फार मोठा वाटा असल्याचेही त्यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावर कित्येक वर्ष धनगर वस्ती झोपडीमध्ये राहते. सरकारने त्यांची वस्ती हटविण्याच्या दृष्टिकोनातून पुढाकार घेतला आहे.
या अनुषंगाने बोलताना श्री. पवार म्हणाले, "रायगडच्या सर्वांगिण विकासासाठी सरकारने आता कुठे पुढाकार घेतला आहे. मात्र, गडावर कित्येक वर्षे असलेल्या धनगर वस्ती हटविण्यासाठी सरकार नोटीस काढत आहेत. एकूणच राजकारण करत आहे. कोणाचे तरी हॉटेल चालवण्यासाठी हे जर होत असेल तर आम्ही होऊ देणार नाही. या ठिकाणी नियमित येणाऱ्या शिवभक्त मावळे पर्यटकांना तेथील बांधवांचे नेहमीच सहकार्य मिळते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री गणेश नाईक तसेच संबंधित खात्याचे अधिकारी यांचेसुद्धा याकडे लक्ष वेधले जाणार आहे. वनखात्याने नोटीस दिलेली आहे. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. वस्ती हटाव मोहीम आम्ही होऊ देणार नाही. तसे केल्यास आंदोलन होईल. सरकारने कोणाला त्रास देऊ नये. हा धनगर समाज शिवरायांचे मावळे आहेत. त्या ठिकाणी २४ घरे आहेत. ते रहिवासी आहेत. त्यांना कार्ड दिले पाहिजे. राज्यातील अनेक संघटना आमच्यासोबत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain : मुंबईत शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, हवामान खात्याकडून २ दिवस रेड अलर्ट जारी; ४८ तास धोक्याचे

Petrol and Diesel: जीएसटी रिफॉर्म लागू झाल्यानंतर पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार? दिवाळीनंतर काय महाग होणार?

Latest Marathi News Live Updates : अंधेरी सबवे मागील तीन तासापासून वाहतुकीसाठी बंद

"मग त्याने एकट्यानेच आर्थिक बाजू का सांभाळावी" तेजश्री प्रधानने टोचले आजच्या तरुणींचे कान, म्हणाली...

Pune News : कोथरुड पोलिसांवर आरोप करणाऱ्या तीन तरुणींसह ५ जणांवर गुन्हा दाखल, मारहाण प्रकरणात नवा ट्विस्ट....

SCROLL FOR NEXT