
Mumbai Rain Updates: मुंबईसह उपनगरात सोमवारी पहाटेपासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. दादरमध्ये रेल्वे ट्रॅकवर पाणी आहे. तर रस्त्यांवर गुडघाभर पाण्यामुळे नदीचं स्वरुप आलं आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून बीएमसीने मुंबईतील दुसऱ्या सत्रातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केलीय. मुंबई महानगरासाठी हवामान विभागाने १८ ऑगस्ट व १९ ऑगस्ट २०२५ रोजी रेड अलर्ट जारी केला आहे.