कोकण

रत्नागिरी -चंपक मैदानातील अनधिकृत बांधकामे हटवा

CD

चंपक मैदानातील अनधिकृत बांधकामे हटवा
एमआयडीसीची नोटीस ; मिऱ्या -नागपूर कामात अडथळा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ : शहराजवळील चंपक मैदानातील अनधिकृत बांधकामे हटवण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने नोटीस दिली आहे. मिऱ्या-नागपूर महामार्गासह टाटा स्किल सेंटरच्या कामात अडथळा येत असल्याने सातजणांना ही नोटीस बजावण्यात आली असून, १५ दिवसांत अतिक्रमण हटवण्याचा इशारा दिला आहे.
चंपक मैदानात ४० गुंठे जागा टाटा स्किल सेंटरसाठी दिली आहे. या ठिकाणी सुरू होत असलेल्या विकासकामांसाठी अतिक्रमण अडथळा ठरत असल्याने अशा बांधकामांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ही नोटीस दिल्यानंतर १५ दिवसांच्या मुदतीत येथील अतिक्रमण न हटवल्यास एमआयडीसीकडून ती अतिक्रमणे हटवली जाणार आहेत तसेच त्यासाठी येणारा खर्च अतिक्रमणधारकांकडून वसूल करण्यात येईल, असे नोटिसीत नमूद केले आहे. अनेक वर्षांपूर्वी ती जागा स्टरलाइट कंपनीला देण्यात आली होती; मात्र स्थानिक विरोधामुळे कंपनी राज्याबाहेर निघून गेली. या जागेचा ताबा चंपक मैदान येथील जागा मिळवण्यासाठी एमआयडीसी आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती.
स्टरलाइट यांच्यात न्यायालयाच्या निकालानंतर ही जागा पुन्हा एमआयडीसीच्या ताब्यात आली. सध्या या जागेचा वापर टाटा स्किल सेंटरसाठी करण्यात येणार आहे. या केंद्राच्या कामाचे भूमीपूजनही केले आहे. तेथील अतिक्रमणामुळे विकासकामांमध्ये अडथळा निर्माण होत असल्यामुळे अतिक्रमण तातडीने हटवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तेथील सहा गुंठे जागेत अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे त्याला एमआयडीसीने नोटीस दिली आहे तसेच मिऱ्या-नागपूर महामार्गामध्येदेखील अऩेकांनी अतिक्रमण केले आहे. त्यांनाही एमआयडीसीने नोटीस दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते; पहाटे 2.30 वाजता होणार महापूजा

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT