63489
कनेडी माध्यमिक विद्यामंदिरचे यश
कनेडी, ता. १३ ः येथील माध्यमिक विद्यामंदिरचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. सन २००४ साली प्रशालेमध्ये सेमी इंग्रजी माध्यम सुरू करण्यात आले. सलग २१ व्या वर्षी सेमी इंग्रजी माध्यमाचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
या प्रशालेतील एकूण ६५ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. पैकी विशेष प्रावीण्य ३१, प्रथम श्रेणीत २६ तर ८ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. प्रशालेतील यशस्वी विद्यार्थी असे ः कृपा कैलास सावंत ९५.२० टक्के (४७६ गुण), तन्वी प्रसाद हर्णे ९४.८० टक्के (४७४ गुण), मैत्रेयी मकरंद आपटे ९३.४० टक्के (४६७ गुण), मराठी माध्यमातील श्रावणी आत्माराम चव्हाण ८१.२० टक्के (४०३ गुण), दीक्षा बळीराम चव्हाण ६९.४० टक्के (३४७ गुण), ठाकूर चैताली शरद ६७.०० टक्के (३३२ गुण). कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे अध्यक्ष सतीश सावंत, चेअरमन आर. एच. सावंत, मुख्याध्यापक सुमंत दळवी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.