निर्लेखित साहित्य पाहणीसाठी उपलब्ध
रत्नागिरी ः गुहागर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विविध व्यवसायांतील निरुपयोगी निकामी हत्यारे, अवजारे, उपकरणे भंगार, निरुपयोगी, निकामी निर्लेखित साहित्य यांचा जाहीर लिलाव आयोजित करण्यात आला आहे. विक्री करावयाचे निर्लेखित साहित्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत इच्छुक खरेदीदारांना पाहणी करण्यासाठी कार्यालयीन वेळेत २ जून २०२५ या कालावधीत उपलब्ध आहे. इच्छुक खरेदीदारांनी सदर साहित्य पाहणी करून दरपत्रके सादर करण्यासाठी कार्यालयीन वेळेत समक्ष संपर्क साधावा, असे प्राचार्यांनी कळवले आहे.
अनुसूचित, नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती
रत्नागिरी ः सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत समाज कल्याण आयुक्तालयामार्फत अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाच्या शिष्यवृत्तीकरिता विद्यार्थ्याकडून अर्ज स्वीकारण्यासाठी २० मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील रोजगार या लिंकवर भेट देऊन अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण दीपक घाटे यांनी केले आहे.
सैन्यदलात अधिकारी पदासाठी प्रशिक्षण
रत्नागिरी ः भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Combined Defence Service (सीडीएस) परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे शासनातर्फे नवयुवक व नवयुवतीसाठी १६ जून ते २९ ऑगस्ट या कालावधीत सीडीएस कोर्स क्र. ६५ आयोजित करण्यात येत आहे. कोर्स कालावधीत प्रशिक्षणर्थीना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाते. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे ११ जूनला सकाळी ११ वाजता मुलाखतीस हजर राहावे. मुलाखतीस येताना Department of Sainik Welfare, Pune (डीएसडब्ल्यू) यांच्या वेबसाईटवर सर्च करून त्यामधील सीडीएस-६५ कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरून सोबत घेऊन यावे. अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ई-मेल आय डी training.pctcnashik@gmail.com येथे किंवा कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी तथा प्र. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रवींद बिरादार यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.