ड्रोनला १६ जूनपर्यंत मनाई
रत्नागिरी, ता. १७ ः जिल्ह्यात १७ मे ते १६ जून या कालावधीत ड्रोन किंवा इतर कोणतीही मानवरहित हवाई वाहने परवानगीशिवाय चालविण्यास किंवा उड्डाण करण्यास किंवा वापरण्यास मनाई करण्यात येत आहे, असा आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिला आहे.
जिल्ह्यात काही असामाजिक तत्वांकडून ड्रोन किंवा इतर मानवरहित हवाई वाहने (यूएव्ही) वापरले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या ठिकाणांना धोका निर्माण होवू शकतो आणि सार्वजनिक शांतता बिघडू शकते. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक असल्याने ड्रोन किंवा इतर कोणतेही मानवरहित हवाई वाहने परवानगीशिवाय चालविण्यास किंवा उड्डाण करण्यास किंवा वापरण्यास मनाई करण्यात येत आहे.
----
‘जिल्हा सैनिक’तर्फे
चिपळुणात मेळावे
रत्नागिरी ः जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे चिपळूण तालुक्यात २१ मे रोजी मोरवणे येथील हनुमान मंदिरात, २२ रोजी खेर्डीतील ग्रामपंचायत हॉलमध्ये, २३ रोजी चिपळूण येथील सैनिकी मुलांच्या वसतिगृहात मेळावे आयोजित केले आहेत. या मेळाव्यात माजी सैनिक, त्यांच्या विधवा, वीर नारी, वीर माता व वीर पिता हे सहभागी होतील. त्यांचे पेन्शन विषयक, अभिलेख कार्यालय विषयक, महासैनिक पोर्टलवर रजिस्ट्रेशन (नोंदणी) तसेच इतर अडचणी सोडविण्यात येतील. या मेळाव्याला येताना डीस्चार्ज पुस्तक, पीपीओची प्रत, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचे पासबुक, इसीएचएस कार्ड व आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल फोन आणणे आवश्यक आहे. या मेळाव्याला उपस्थित राहून सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
---
मुलींच्या आयटीआयमध्ये
प्रवेश प्रक्रिया सुरू
रत्नागिरी : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया १५ मे पासून सुरू झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज करावयाचा आहे. त्यासाठी http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळाचा उपयोग करता येईल. याबाबतची माहिती पुस्तिका संकेतस्थळावर उपलब्ध आहे. याठीकाणी कॉस्मेटॉलॉजी, फ्रूटस अॅण्ड व्हेजिटेबल प्रोसेसिंग, ड्रेस मेकिंग, स्युईंग टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर ऑपरेटर अॅण्ड प्रोग्रामिंग असिस्टंट, इंफॉरमेशन अॅण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टिम मेंटेनन्स हे व्यवसाय शिकविले जातात. अर्ज नोंदवून झाल्यावर उमेदवारांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जाऊन आपला अर्ज निश्चित करावा व त्यानंतर विकल्प सादर करावेत. प्रवेश प्रक्रियेच्या विविध टप्प्यांबाबत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये समुपदेशन करण्यात येत आहे. यामध्ये उमेदवारांना विविध व्यवसाय अभ्यासक्रमांची माहिती देण्यात येते. आयटीआय प्रवेशित उमेदवारांना दरमहिन्याला देण्यात येणाऱ्या विद्यावेतनात वाढ केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.