- rat२०p१२.jpg -
२५N६५०१६
सावर्डे: संस्थेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आर्या नांदिवडेकर
-----
आर्या नांदिवडेकरला ९९ टक्के गुण
सह्याद्री शिक्षणसंस्था; २४ विद्यालयांचा निकाल शंभर टक्के
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. २० : कोकण विभागीय मंडळामार्फत घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेत सह्याद्री शिक्षणसंस्थेच्या ३६ माध्यमिक शाळेतून गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डेच्या आर्या नांदिवडेकरने ९९ टक्के गुण मिळवून संस्था शाळांत प्रथम क्रमांक प्राप्त करण्याचा मान मिळवला.
निकम विद्यालयाच्या आरोही क्षीरसागर हिने ९८. ४० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर स्वरा सरमळकर व न्यू इंग्लिश स्कूल खेर्डीच्या दर्शन कदमने ९७. ८० टक्के गुण मिळवून संस्थेत विभागून तृतीय क्रमांक प्राप्त करण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. न्यू इंग्लिश स्कूल खेर्डीच्या सायली जाधवने ९७ टक्के गुण मिळवून चौथा क्रमांक तर न्यू इंग्लिश स्कूल खेर्डीच्या ओम पवार व इंग्लिश मीडियम स्कूल खेर्डीच्या अध्याय सकपाळने ९६.८० टक्के गुण संस्थेत विभागून पाचवा क्रमांक प्राप्त केला आहे. संस्थेच्या पहिल्या पाच क्रमांकामध्ये गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने सलग प्रथम तीन क्रमांक पटकावले. रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात संस्थेच्यावतीने चालवल्या जाणाऱ्या ३६ माध्यमिक विद्यालयांतून१६०४ विद्यार्थी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेला प्रविष्ट झाले होते त्यापैकी १५९७ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन सह्याद्रीचा शेकडा निकाल ९८. ४४ इतका लागला आहे. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे सह्याद्री शिक्षणसंस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखर निकम, संचालक शांताराम खानविलकर, चंद्रकांत सुर्वे, मारूतीराव घाग, मानसिंग महाडिक, आकांक्षा पवार, सचिव महेश महाडिक, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व शिक्षणप्रेमी पालकांनी अभिनंदन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.