कोकण

नक्षत्रांशी नाते

CD

- rat२१p३१.jpg-
२५N६५३१७
डॉ. जयंत नारळीकर यांच्यासोबत बापू गवाणकर.

आठवणी-----लोगो
(सदर पद्धतीने लावावे)
ठरलेली वेळ निघून गेली होती. विद्यार्थ्यांनी ताटकळत राहू नये म्हणून डॉ. जयंत नारळीकर यांनी रिक्षा केली आणि थेट महाविद्यालयात निघून आले. त्यात राग नव्हता, होते ते विद्यार्थ्यांवरील प्रेम, वक्तशीरपणा. हे त्यांच्या साधे राहणीमान आणि उच्च विचारसरणी याचे मूर्तीमत उदाहरण.
- बापू गवाणकर, काळबादेवी
----
नक्षत्रांशी नाते...
आयपीएलमध्ये १४ वर्षाचा बॅट्समन वैभव सूर्यवंशी गुजरात विरुद्ध जादू झाल्यासारखा खेळत होता आणि त्याची बॅटिंग बघत असताना मला आठवली ती डॉ. जयंत नारळीकर यांची ती कथा. त्या कथेचा नायक असाच तडाखेबाज खेळतो आणि आपल्या संघाला विजय मिळवून देतो. नारळीकर यांनी लिहिलेल्या कथेचा नायक नेहमी उजव्या हाताने बॅटिंग करत होता; पण एका सामन्यात त्याचे अचानक जीन्स बदलतात आणि तो डावखुरा बॅटिंग करू लागतो. नंतर विरोधी संघाला गोंधळात टाकत आपल्या संघाला विजय मिळवून देतो, असे ते कथानक होते. सूर्यवंशीची बॅटिंग पाहताना आठवले ते डॉ. नारळीकर. त्यांच्या फलंदाजीतील प्रत्येक शॉटला मला ती कथा आठवून आठवत होती. मी ती बायकोला सांगत होतो आणि बरोबर त्यांचे मोठेपणही. कारण, मला डॉ. नारळीकर यांचा सहवास लाभला होता.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवात सुवर्णकाळ सुरू होण्यासाठी अरूअप्पा जोशी आणि देव सरांच्या काळात अनेक कर लाभले. त्यात डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. राम नगरकर, डॉ. अरूण निगवेकर, डॉ. अनिल काकोडकर, डॉ. शिवाजीराव भोसले, डॉ. नीतू मांडके त्यातच हा आकाशाशी नातं सांगणारा आपल्या कराने नक्षत्रांशी गप्पा करणारा महान शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर. महाविद्यालयातील डॉ. बावडेकर व्याख्यानमालेच्या निमित्ताने डॉ. नारळीकर व्याख्याते म्हणून आले होते. दोन्ही दिवशी राधाबाई शेट्ये सभागृहात तारांगण फुलले होते आणि सारे सभागृह शब्दांच्या चांदण्यात विहार करत होते. व्याख्यान काय होते हे या ठिकाणी सांगण्याची गरज नाही; पण माणसाची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी कशी असू शकते, ते सांगतो. पाहिल्या दिवशीचे व्याख्यान संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबर गप्पा असा एक छोटेखानी कार्यक्रम होता. डॉ. नारळीकर यांची राहण्याची व्यवस्था रत्नागिरी शहरातील एका हॉटेलमध्ये केली होती. ते रत्नागिरीत आल्यानंतर त्यांच्या व्यवस्थेसाठी गाडीसह एका प्राध्यापकाची नेमणूकही केली होती. सकाळी १० वाजताचा कार्यक्रम म्हणून ९.३० वाजता गाडी घेऊन हॉटेलवर जायचे आणि त्यांना महाविद्यालयात आणायचे, असे ठरले. आमचे प्राध्यापक महाशय थोडे उशिरा पोचले. ठरल्या वेळेप्रमाणे डॉ. नारळीकर रूममधून खाली आले. ठरलेली वेळ निघून गेली होती. विद्यार्थी ताटकळत राहू नयेत म्हणून डॉ. नारळीकर यांनी रिक्षा केली आणि थेट महाविद्यालयात निघून आले. त्यात राग नव्हता, होते ते विद्यार्थ्यांवरील प्रेम, वक्तशीरपणा. हे त्यांच्या साधे राहणीमान आणि उच्च विचारसरणी याचे मूर्तिमंत उदाहरण.
या जीवसृष्टीत सत्य आणि खरेपणा म्हणजे काय तर तो म्हणजे मृत्यू. त्यांना मृत्यूदेखील साधेपणाने आणि शांतपणे आला असेल हे नक्की. अशी माझ्या महाविद्यालयाशी नाते जोडणारी माणसे निघून जातात त्या वेळी मनाचा एक कप्पा ओला होतो. त्यांच्या आठवणी सहवासातील ते क्षण हळूहळू पाझरू लागतात. मन भूतकाळात जातं आणि जबरदस्तीने परमेश्वराजवळ मागणी करतो. आज तुझ्या दारी आलेल्या या महान व्यक्तीचं समोर येऊन स्वागत कर, तुझ्या तारांगणात एका तेजस्वी ताऱ्याची भर पडली आहे. महान शास्त्रज्ञ, लेखक आणि प्रेमळ माणूस अशा डॉ. जयंत नारळीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली...!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT