swt287.jpg
66732
श्री देव मायापूर्वचारी पंचायतन
मळगाव येथे सोमवारपासून
मूर्ती पुनर्प्रतिष्ठापना सोहळा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २८ ः मळगाव गावचे ग्रामदैवत श्री देव मायापूर्वचारी व पंचायतन आणि परिवार देवतांच्या मूर्तींचा पुनर्प्रतिष्ठापना सोहळा सोमवार (ता. २) ते गुरुवार (ता. ५) या कालावधीत आयोजित केला आहे. सोमवारी (ता. २) प्रायश्चित्त विधी, सकाळी देवाला नारळ ठेवणे, देवांची संमती घेणे, प्रायश्चित्त, केशवपन, पंचगव्य होम, पंचगव्य प्राशन, प्रायश्चित्त विधान, महाप्रसाद आणि सांगता, मंगळवारी (ता. ३) तत्त्वोद्धार विधी, सकाळी पुण्याहवाचन, संभारदान, मधुपर्क, आचार्यादी ब्राह्मण वरण, स्थलशुद्धी, अज्ञोरहोम, देवांची महापूजा, तत्वचालन होम, तत्वोद्धार, पूर्णाहुती, महाप्रसाद आणि सांगता, बुधवारी (ता. ४) श्री देव मायापूर्वचारी सपरिवार देवता अर्चाविधी, सकाळी स्थलशुद्धी, जलाधिवास, स्नानविधी, शय्याधिवास, पीठदेवता स्थापना, अग्निस्थापना, वास्तुयजन, ग्रहयजन, पर्याय होम, महाप्रसाद आणि सांगता. गुरुवारी (ता. ५) मुख्य प्रतिष्ठापना सोहळा होणार आहे.
यानिमित्त सकाळी स्थलशुद्धी, ७ वाजता देव उठवणे, तत्वन्यासहोम, तत्वन्यास व प्राणप्रतिष्ठा, देवतांची महापूजा, बलिदान, पूर्णाहुती, अभिषेक, आरती, मंत्रपुष्प, गाऱ्हाणे (सामूहिक प्रार्थना), ब्राह्मण पूजन, महाप्रसाद आणि सांगता असे कार्यक्रम होणार आहेत. या सोहळ्यात सर्व ग्रामस्थ, माहेरवाशिणी, देणगीदार आणि भाविक भक्तगणांनी सहभागी होऊन श्री देव मायापूर्वचारी व परिवार देवतांचा आशीर्वाद घ्यावा, असे आवाहन मानकरी आणि सोनुर्ली-मळगाव ग्रामस्थांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.