कोकण

बांधकाम, महामार्ग विभाग ‘नापास’

CD

67288


बांधकाम, महामार्ग विभाग ‘नापास’

कुडाळात ‘आपत्कालीन’ तालीम; प्रशासकीय यंत्रणांना मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ३१ ः एखादी अचानक आपत्ती आली तर संबंधित यंत्रणा किती अलर्ट आहेत आणि किती वेळात घटनास्थळी पोहोचतात, याची रंगीत तालीम कुडाळचे तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी शुक्रवारी (ता. ३०) घेतली. या परीक्षेत ज्या ठिकाणी आपत्त्ती घडल्याचे कळविले, तो महामार्ग विभाग मात्र यात सपशेल अपयशी झाला. महामार्ग विभागाचे कोणीच अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांचे पथक घटनास्थळी फिरकलेही नाहीत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कुडाळ कार्यालयालयाने आमच्या अखत्यारित हा भाग येत नाही, असे कळविल्याने तहसीलदार वसावे यांनी नाराजी व्यक्त केली.
तहसीलदार वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्‍तरीय नैसर्गिक आपत्‍तीच्‍या अनुषंगाने रंगीत तालीम मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ येथे हॉटेल लेमनग्रास समोर घेण्यात आली. सहायक महसूल अधिकारी नीता पवार यांनी तहसील कार्यालयातील नियंत्रण कक्षातून सर्व यंत्रणांना घडलेल्या घटनेसंदर्भात माहिती देऊन समन्वय साधला. त्याला प्रतिसाद देत पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम सहा मिनिटांत पथकासह घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन विभागाचे प्रमुख अग्निशमन विमोचक प्रमोद परब हे पथकासह आणि अग्निशामक बंबासह नऊ मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तत्काळ आग अटोक्यात आणली. नगरपंचायत विभागाचे गजानन पेडणेकर हे फायर बाईकसह तसेच संजय टेबुलकर पथकासह १४ मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. आरोग्य विभागाचे आरोग्य सहाय्यक राघोजी चेंदवणकर, आरोग्य सेवक रवींद्र गावडे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र पणदूरची रुग्णवाहिका व आरोग्य पथक डॉ. कविता पराडकर, परिचारिका श्रीम. टेमकर यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. निवासी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव, महसूल नायब तहसीलदार संजय गवस, नायब तहसीलदार प्रमोद पिळणकर, मंडळ अधिकारी श्री. गुरव, ग्राम महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविल्यावर त्यांनी मात्र घटनास्थळी या विभागाच्या अखत्यारित येत नसून राष्ट्रीय महामार्ग विभागाला कळवा, असे सांगितले. राष्ट्रीय महामार्ग विभागाला कळवूनही त्यांचा अधिकारी किंवा पथक उपस्थित नव्हते. तहसीलदार वसावे यांनी याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. इतर सर्व यंत्रणा घटनास्थळी वेळीच उपस्थित झाल्याबाबत सर्वांचे आभार मानून आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यानंतरही असाच सर्वांनी प्रतिसाद द्यावा, असे सांगून उपस्थितांना मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nizamuddin Dargah: निजामुद्दीन दर्गा परिसरात मोठा अपघात; छत कोसळून ५ जणांचा मृत्यू

'सैराट' साठी तानाजी गळगुंडेला लाख नाही तर काही हजारांमध्ये मिळालेले पैसे; सगळे मित्राच्या हातात ठेवले कारण...

Latest Marathi News Live Updates : २३ व्या मजल्यावरून उडी मारून दिला जीव

ED Raid on Congress MLA : मोठी बातमी! काँग्रेस आमदाराच्या ठिकाणांवर 'ED'चे छापे; कोट्यवधींचे सोने अन् रोकड जप्त

स्वातंत्र्यापूर्वीच्या नोटांवर गांधी नव्हे, नेताजींचा फोटो! आरबीआयच्या आधीची बँक कोणती? वाचा नेताजींच्या चलनाची अज्ञात कहाणी

SCROLL FOR NEXT