कोकण

पावसाळ्यात अखंडीत विजपुरवठ्यासाठी नियोजन करा

CD

rat३१p५.jpg -
२५N६७२७७
राजापूर ः ग्रामस्थांसह महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधताना आमदार किरण सामंत.

अखंडित वीजपुरवठ्याचे नियोजन करा
आमदार किरण सामंत ः महावितरणला अहवाल बनवण्याच्या सूचना
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ३१ ः मॉन्सूनपूर्व पावसामुळे अनेक भागात वीजपुरवठा खंडित होत आहे. भविष्यात राजापूर तालुक्यासह शहरात अखंडित वीजपुरवठा सुरू ठेवण्यासाठी आतापासून नियोजन करा, अशा सूचना वीज महावितरण विभागाला आमदार किरण सामंत यांनी दिल्या. त्यासाठी आवश्यक साधनसामग्री व करावयाच्या उपाययोजनांचा विस्तृत अहवाल सादर करण्यासही सांगितले.
राजापूर शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा मॉन्सूनपूर्व पावसातच कोलमडला आहे. अनेक भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून, महावितरणकडून योग्य माहिती दिली जात नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. याबाबत भाजप युवा कार्यकर्ते अरविंद लांजेकर यांनी आमदार सामंत यांच्याशी चर्चा करून एका बैठकीचे आयोजन केले होते. त्यामध्ये राजापूर वीजवितरण संबंधित समस्या मार्गी लावण्याची मागणी अनेकांनी केली होती. या बैठकीत विभागनिहाय वीजवितरणसंबंधित समस्यांचा आढावा घेण्यात आला. धोकादायक वीजखांब बदलणे, ट्रान्स्फॉर्मर बदलणे, यांसह अन्य तक्रारी ग्रामस्थांनी मांडल्या. शहरातील भूमिगत वीजवाहिन्यांच्या रखडलेल्या कामासह या दर्जाहीन झालेल्या कामाचीही तक्रार या वेळी करण्यात आली. त्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना वीजवितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना करण्यात आल्या. या बैठकीला पोलिस निरीक्षक अमित यादव, भाजप जिल्हा सरचिटणीस रवींद्र नागरेकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशफाक हाजू, शिवसेना तालुकाप्रमुख दीपक नागले, राजापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष संजय ओगले, प्रकाश कुवळेकर, शहरप्रमुख सौरभ खडपे, अरविंद लांजेकर, पाचल माजी उपसरपंच किशोर नारकर, उमेश पराडकर, आबा आडिवरेकर आदी उपस्थित होते.
-----
ग्राहकांचे म्हणणे ऐकून घ्या
विद्युत्‌पुरवठा खंडित झाल्यानंतर लोकांकडून वीजवितरण विभागाचे अधिकाऱ्यांशी मोबाइलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातो; मात्र, अनेकवेळा अधिकाऱ्यांचे मोबाईल फोन बंद असतात तसेच संपर्क झाला तरीही ते उचलत नाहीत, या तक्रारी लोकांनी सभेमध्ये मांडल्या. त्याची दखल घेताना आमदार सामंत यांनी सर्व अधिकाऱ्‍यांनी आपले मोबाईल बंद ठेवू नका, असे बजावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fetus Gender Testing Center: गर्भलिंग चाचणी केंद्र कळवा अन् एक लाख रुपये मिळवा! काय आहे 'ही' योजना जाणून घ्या

Pune: अर्धवट कपडे अन् हातात विळा, बसमध्ये चढून व्यक्तीचा तरुणावर हल्ला अन्...; व्हायरल व्हिडिओनं बारामती हादरलं

Mumbai News: धारावी पुनर्वसनावरून नागरिकांचा रोष, मुलुंडमध्ये स्थलांतर विरोधात उपोषण; मविआचा पाठिंबा

Malegaon Bomb Blast : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात पंतप्रधान मोदींना अडकवण्याचा होता कट; साध्वी प्रज्ञासिंह यांचा खळबळजनक दावा

Latest Maharashtra News Updates Live: पतीने केला पत्नीचा खून

SCROLL FOR NEXT