कोकण

एका क्लिकवर शासकीय योजनांची माहिती

CD

एका क्लिकवर शासकीय योजनांची माहिती
चिपळुणातील शासकीय कार्यालये; तक्रार करण्याचीही सुविधा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३१ : लोकसेवांची सुची असलेले क्युआर कोड सार्वजनिक ठिकाणी लावण्याच्या शासनाच्या आदेशानुसार अनेक शासकीय कार्यालयांनी लावले आहेत. त्यामुळे क्युआरकोड स्कॅन करताच शासकीय सेवा, त्यासाठी लागणारे शुल्क व काम पूर्ण होण्याची मुदत आदी माहिती नागरिकांना सहज समजत आहे. तसेच तक्रार करण्याचीही सुविधा आहे.
लोकसेवा हक्काचा कायदा २०१५ मध्ये तयार झाला आहे. त्यात अनेक तरतुदी आहेत; मात्र त्याबाबत शासकीय कार्यालये स्तरावर उदासीनता असल्याने या कायद्यानुसार नागरिकांना सेवांची माहिती मिळत नव्हती. केवळ कार्यालयांमध्ये हे फलक लावण्यात आले असून, त्याची अन्य भागात जनजागृतीकडे सर्वच कार्यालयांनी उपयुक्त माहितीसह तक्रारही करण्याच्या सुविधेकडे दुर्लक्ष केले होते. हे शासनाच्या लक्षात आल्याने आता प्रत्येक कार्यालयाच्या सेवांचा क्युआरकोड तयार करण्यात आला असून, तो सेवा हक्क दिनाच्या पार्श्वभूमीवर लावण्याचे आदेश शासनाने सर्व कार्यालयांना दिले होते. त्यानुसार येथील प्रांत, तहसील, नगर पालिकेने आपल्या सेवांचे क्युआर कोड कार्यालयांबाहेर लावले आहेत. हे क्युआर कोड स्कॅन करताच त्या कार्यालयांमार्फत दिल्या जाणाऱ्या सुविधा, त्यासाठी लागणारे शुल्क व ते काम किती दिवसात होईल, याची संपूर्ण माहिती मिळत आहे. एवढेच नव्हे तर त्या कार्यालयाची तक्रार करण्यासाठी दुसरा क्युआर कोड लावण्यात आला आहे. त्यामुळे तक्रार करणेही सोपे झाले आहे.
----
शहरभर लावणार फलक
नगरपालिकेच्या माध्यमातून जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, विवाहनोंदणी, नव्याने कर आकारणी, करमाफी मिळणे, थकबाकी नसल्याचा दाखला, वारसाहक्काने मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे, आक्षेप नोंदवणे, झोन दाखला देणे, भाग नकाशा देणे, बांधकाम परवाना देणे, भोगवटा प्रमाणपत्र देणे, नळजोडणी देणे, प्लंबर परवाना, मंडपासाठी नाहरकत दाखला, फेरीवाले नोंदणी प्रमाणपत्र देणे आदी ६५ प्रकारच्या सेवा दिल्या जातात. त्याचा क्युआर कोड सध्या नगर पालिका परिसरात लावण्यात आला आहे तसेच शहरातील विविध भागात लावण्याची प्रक्रिया मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी सतीश दंडवते, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, कार्यालय अधीक्षक रोहित खाडे, उद्यान विभागप्रमुख प्रसाद साडविलकर आदींनी सुरू केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi Speech Live Update : पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, देशाला करणार संबोधित

Independence Day 2025 : पंतप्रधान मोदींचे राजघाटावर महात्मा गांधींना अभिवादन, लाल किल्ल्यावर बाराव्यांदा तिरंगा फडकवणार

Solapur Monsoon Update: साेलापुरला मुसळधार पावसाचा इशारा! 'हिप्परगा तलाव फुल्ल, प्रवाह मंदावला'; सांडव्यातून ४०० क्युसेकचा विसर्ग

Child Daycare Tip: मुलांना डे-केअरमध्ये पाठवताय? तर पालकांनी ह्या प्रकारे घ्या सुरक्षेची काळजी

वेतन अधीक्षकांचे आदेश! ‘ही’ कागदपत्रे नसलेल्या शिक्षकांचा थांबणार पगार; ऑगस्टच्या पगारबिलासोबत मुख्याध्यापकांना जोडावी लागणार सर्वांची कागदपत्रे अपलोड केल्याची प्रत

SCROLL FOR NEXT