कोकण

रत्नागिरी जिल्ह्याला मिळणार १ आयसीयू बालरुग्णवाहिका

CD

जिल्ह्याला मिळणार एक आयसीयू बालरुग्णवाहिका
राज्यात १७५६ अत्याधुनिक रुग्णवाहिका; संकटकालीन स्थितीत तातडीने मदत
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : आपत्कालीन वैद्यकीय-सेवेंतर्गत १०८ रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णांना तातडीची मदत मिळते. आता या सेवेंतर्गत अत्याधुनिक १ हजार ७५६ रुग्णवाहिका राज्याला मिळणार आहेत. त्यापैकी रत्नागिरीला एक आयसीयू बालरुग्णवाहिका मिळणार आहे. या रुग्णवाहिका प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज असणार आहेत. याची अंमलबजावणी येत्या काही दिवसातच होणार आहे.
राज्याच्या शहरी आणि ग्रामीण भागातील रुग्णांना तत्काळ आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी १०८ रुग्णवाहिका सेवा सुरू केली. आता या अत्याधुनिक रुग्णवाहिकांच्या माध्यमातून अद्ययावत आरोग्यसेवा प्रदान केली जाणार आहे. या रुग्णवाहिकेमध्ये डॉक्टर आणि निम्नवैद्यकीय कर्मचारीही असणार आहेत. हा नवीन १०८ रुग्णवाहिका कार्यक्रम राज्यभर राबवण्यात येणार आहे. यात भागीदार संस्था १ हजार ७५६ अत्याधुनिक रुग्णवाहिका तैनात करणार आहे.
आपत्कालीनप्रसंगी रुग्णांना तातडीची काळजी आणि उपचार या रुग्णवाहिकेमध्ये मिळेल. त्यात प्राणवायू सुविधा, अत्याधुनिक स्ट्रेचर आणि हृदयविकारासंदर्भातील उपकरणे असतील. या नवीन १०८ प्रकल्पाचा प्रारंभ राज्यात पाच टप्प्यांत होणार असून, त्याची अंमलबजावणी नोव्हेंबरपासून सुरू होईल. त्यासाठी सुमारे १ हजार ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. या अत्याधुनिक रुग्णवाहिका या वेगवेगळ्या प्रकारच्या असणार आहेत. त्यात बेसिक लाइफ सपोर्ट, अॅडव्हान्स्ड लाइफ सपोर्ट, निओनटल केअर युनिट या प्रकारच्या रुग्णवाहिकांसोबत दुचाकी रुग्णवाहिका, बोट रुग्णवाहिकांचा समावेश असेल. सार्वजनिक-खासगी भागीदारीतून हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. आरोग्य प्रशासनाने याला दुजोरा दिला.

चौकट
नवीन अत्याधुनिक रुग्णवाहिका सुविधा
* मोबाइल डाटा टर्मिनल - रुग्णाची माहिती रुग्णवाहिकेतून थेट रुग्णालयाला पाठवणारी यंत्रणा
* वैद्यकीय टॅबलेट - अत्याधुनिक वैद्यकीय तपासणीसाठी संगणकीय उपकरण
* आरएफआयडी - जीपीएस रुग्णवाहिकेचे नेमके ठिकाण दाखवणारी यंत्रणा
* ट्रायएज सिस्टिम - रुग्णाच्या स्थितीनुसार उपचाराची तीव्रता दर्शवणारी यंत्रणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivli west Building incident : मोठी बातमी! डोंबिवली पश्चिमेतील 25 कुटुंब राहत असलेली चार मजली इमारत खचली!

Rahul Gandhi and Mallikarjun Kharge: ...म्हणून यंदा राहुल गांधी अन् खर्गे लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला गेले नाहीत!

Lionel Messi चा तीन दिवसीय भारत दौरा, मुंबईत वानखेडेसह ब्रेबॉनवरही खेळणार, कधी आणि केव्हा? वाचा संपूर्ण वेळापत्रक

Love Jihad : हैदाराबादेत 'लव्ह जिहाद'चं प्रकरण उघडकीस; मूळचा पाकिस्तानी असणाऱ्या भामट्याने हिंदू मुलीला फसवलं अन्...

Maharashtra Rain Alert: पुढील दिवस महत्त्वाचे! मुंबईला मुसळधारेचा इशारा, महाराष्ट्रात कसे असेल हवामान?

SCROLL FOR NEXT