कोकण

किमान ८ ''गणपती स्पेशल'' रेल्वे सोडा

CD

किमान ८ ‘गणपती स्पेशल’ रेल्वे सोडा
प्रवाशी संघटनाः गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मागणी
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १२ः गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी प्रवासी संघटनेने कोकण रेल्वे, मध्य आणि पश्चिम रेल्वेकडे विशेष गाड्यांची मागणी केली आहे. यंदा २७ ऑगस्टला गणेश चतुर्थी असल्याने १८ ऑगस्ट ते १० सप्टेंबर दरम्यान दररोज किमान ८ अप आणि ८ डाऊन अशा नवीन विशेष गणपती रेल्वे सोडाव्यात, अशी मागणी संघटनेने केली आहे. या कालावधीत कोकण रेल्वेवरील मालवाहतूक पूर्णपणे बंद करावी, अशीही विनंती केली आहे.
मागण्यामध्ये जादा रेल्वे फेऱ्या गणेश चतुर्थीपूर्वी, म्हणजे २२ ते २६ ऑगस्ट दरम्यान, मुंबईतून कोकणाकडे जाणाऱ्या (डाऊन मार्गावर) अधिक रेल्वे सोडाव्यात. गौरी-गणपती विसर्जन २ सप्टेंबरला असल्याने, ३ ते ७ सप्टेंबर दरम्यान कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या (अप मार्गावर) जादा गणपती स्पेशल सोडाव्यात. मुंबई ते मडगाव दरम्यानच्या १८ ते २० तासांच्या प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी, परतीच्या प्रवासातील (अप मार्गावरील) सर्व जादा रेल्वे गणपतीच्या काळात मडगाव-मिरजमार्गे पनवेलला वळवाव्यात. सर्व अनारक्षित रेल्वे गणपतीपूर्वी एक महिना आधी जाहीर कराव्यात, जेणेकरून चाकरमान्यांना वेळेत माहिती मिळेल. चाकरमान्यांची जास्त वस्ती मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरांमध्ये असल्याने, जादा रेल्वे पनवेलऐवजी सीएसएमटी, दादर, कुर्ला, दिवा, वांद्रे, वसई आणि वलसाड येथून सोडाव्यात. मेमू रेल्वे सध्याच्या १२ डब्यांऐवजी २२ ते २४ डब्यांच्या चालवाव्यात. तुतारी एक्सप्रेस २४ डब्यांची चालवावी. गणेशोत्सवाच्या काळात कोकण रेल्वेवरील कंटेनर वाहतूक (मालगाड्या) पूर्णपणे बंद करावी किंवा त्या पनवेल-मिरज मार्गे मडगावला वळवाव्यात. पश्चिम रेल्वेच्या वसईमार्गे वांद्रे, दादर, मुंबई सेंट्रल, वसई रोड, अहमदाबाद, उधना येथूनही कोकणाकडे रेल्वे चालवाव्यात. मुंबई ते रत्नागिरी दरम्यान अनारक्षित डबल डेकर रेल्वे चालवाव्यात. गणपती स्पेशल रेल्वे कर्नाटक/केरळपर्यंत न सोडता त्या मुंबई ते सावंतवाडी/मडगाव दरम्यानच चालवाव्यात आदी विषय मांडले आहेत. या मागण्यांचे निवेदन कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा, मध्य व पश्चिम रेल्वेचे जनरल मॅनेजर, तसेच रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे, रायगडचे खासदार सुनील तटकरे आणि पालघरचे खासदार डॉ. हेमंत सावरा यांना पाठवले आहे. या निवेदनावर प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शेखर बागवे आणि सेक्रेटरी यशवंत जडयार यांच्या सह्या आहेत.

चौकट
अनारक्षित रेल्वेंची माहिती लवकरच जाहीर करा
दरवर्षी गणेशोत्सवाला मुंबईतून लाखो चाकरमानी कोकणात आपल्या गावी जातात. सध्या कोकण रेल्वे मार्गावर नियमित धावणाऱ्या मेल, एक्सप्रेस गाड्यांची संख्या कमी असल्याने गणेशभक्तांच्या तुलनेत त्या अपुऱ्या पडतात. यामुळे यावर्षी कोकणाला गणपतीसाठी साधारणपणे ५०० जादा फेऱ्यांची आवश्यकता असल्याचे प्रवासी संघटनेने म्हटले आहे. गेल्या वर्षी अनारक्षित रेल्वे उशिराने जाहीर केल्याने त्याची माहिती चाकरमान्यांपर्यंत पोहोचली नाही आणि परिणामी त्या रिकाम्या धावत होत्या, असेही संघटनेने निवेदनात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 5th Test: भारताचे जबरदस्त कमबॅक! मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णाच्या तिखट माऱ्यानंतर यशस्वी जैस्वालचा प्रहार

Prajwal Revanna : माजी पंतप्रधानांच्या नातवाने केले शेकडो महिलांचे लैंगिक शोषण; हजारो अश्लील व्हिडिओ, कोर्ट उद्या सुनावणार शिक्षा

IND vs ENG 5th Test: तू आम्हाला गप्प बसायला काय सांगतोस? KL Rahul भर मैदानात अम्पायरला भिडला! प्रसिद्ध कृष्णा-जो रूट यांच्या वादात उडी Video Viral

Onion Rate Decrease : कांदा दर घसरले! शेतकरी अडचणीत; साठवणुकीवर दिला जातोय भर

Mumbai News : योगेश कदम यांच्याकडून ‘सावली बार’ ऑर्केस्ट्राचा परवाना परत

SCROLL FOR NEXT