कोकण

रस्त्यावर मिळालेली बॅग मालकास परत

CD

रस्त्यावर मिळालेली
बॅग मालकास परत
कणकवली ः गोव्याहून देवगड असा प्रवास करणारे डॉ. प्रमोद आपटे हे बसमधून उतरल्यावर नांदगाव तिठा महामार्ग पुलावरील सेवारस्त्यालगत बॅग विसरून देवगडला गेले. काही वेळानंतर तेथून जाणारे श्री. कुणकेरकर यांनी ही बॅग पाहून नांदगाव सरपंच भाई मोरजकर यांना माहिती दिली. सरपंच मोरजकर, पोलिसपाटील वृषाली मोरजकर, ऋषिकेश मोरजकर यांनी त्यातील आधारकार्डवरील मोबाईलवर संपर्क साधून ही बॅग आपटे यांना बोलावून त्यांच्या ताब्यात दिली. सुटकेसमध्ये आपटे यांचे आधारकार्ड होते. त्यांच्याशी संपर्क साधला असता ते नांदगाव पोलिसपाटील यांच्या निवासस्थानी आले. त्यानंतर सरपंच मोरजकर यांनी त्यांना ही बॅग सुपूर्द केली.
...................
वेताळबांबर्डेत बुधवारी
‘भानुमती स्वयंवर’
कुडाळ ः वेताळबांबर्डे मित्रमंडळातर्फे वेताळबांबर्डे येथील मांगल्य मंगल कार्यालयात बुधवारी (ता. १८) सायंकाळी ७ वाजता दशावतारातील निवडक कलाकारांच्या संचातील संयुक्त दशावतार मंडळाचे ‘भानुमती स्वयंवर’ नाटक आयोजित केले आहे. यामध्ये गणपती-मधुकर धुरी, रिद्धी सिद्धी- अर्जुन कुंभार, भीष्म-संजय वालावलकर, दुर्योधन-प्रसाद तवटे, कर्ण-संजय काळे, शल्य-साहिल तळकटकर, राजा-आनंद नार्वेकर, अर्जुन-विनायक कोनकर, सेवक-मंगेश साटम, शकुनी-सुनील खोर्जुवेकर, भानुमती-यश जळवी, सुशीला-सिद्धेश मुणनकर व नवरा-पिंट्या दळवी या कलाकारांचा समावेश आहे. हार्मोनियम-आशिष तवटे, झांज-बाबू कोरगावकर यांची संगीतसाथ आहे. कथा संकल्पना बाळा राऊळ (खवणे) यांची आहे. नाटकास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
--------
म्हापण येथे उद्या
समाधान शिबिर
म्हापण ः महसूल विभागांतर्गत म्हापण मंडळातील परुळेबाजार ग्रामपंचायत सभागृहात मंगळवारी (ता. १७) सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान आयोजित केले आहे. यामध्ये शेतकरी व ग्रामस्थांसाठी विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या दाखल्यांचे वितरण, मोफत आरोग्य तपासणी तसेच आरोग्यमान भारत कार्डसाठी नोंदणी, कृषी विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सर्व सोयीसुविधा योजनांची माहिती, ॲग्रीस्टॅक नोंदणी आदी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. सर्व शेतकरी, विद्यार्थी व महिलांनी या योजनांचा एकाच ठिकाणी लाभ घेण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
----
संततधार पावसाने
बळिराजा सुखावला
वेंगुर्ले ः गेले आठ ते दहा दिवस उसंत घेतलेला पाऊस अचानक दोन दिवसांपासून पुन्हा सक्रीय झाल्याने शेतीच्या कामांना गती येणार आहे. सध्या संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यात पेरणी कामे पूर्ण झाली असून पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बळिराजा सुखावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वेतन अधीक्षकांचे सर्व मुख्याध्यापकांना आदेश! शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे अपलोड करण्यास ३० ऑगस्टपर्यंत मुदत; ‘त्या’ शिक्षकांचा थांबणार पगार

Rajasthan Accident: राजस्थानात अपघातात अकरा जण ठार;चालकाला डुलकी लागल्याचा प्राथमिक अंदाज

आजचे राशिभविष्य - 14 ऑगस्ट 2025

अग्रलेख : शिळ्या कढीला ऊत

स्वातंत्र्य आपल्या मनाचं

SCROLL FOR NEXT