
आहाराचे निर्णय माणसाच्या जिभेवर म्हणजे रूचीवर आणि अभिरूचीवर सोडायचे असतात. नाही तिथे सरकारने नाक खुपसण्याचे कारण नाही.
आपण लोकशाहीव्यवस्थेत राहतो. या व्यवस्थेच्या मुळाशी काही मूल्ये आहेत. त्या मूल्यांचा विचार केला तर सत्तास्थापनेसाठी बहुमताला महत्त्व असले तरी राज्य बहुसंख्यांकांचे असते, असे मानले जात नाही. अगदी बहुसंख्य जरी एका विचाराचे असले तरीदेखील अल्पसंख्याकांचे मत आणि हितही तेवढेच महत्त्वाचे असते, असा त्याचा अर्थ होतो.