कोकण

-जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानचा सन्मान

CD

- rat१६p४९.jpg-
२५N७०९७७
हैदराबाद ः येथील राजभवनमध्ये रक्त संकलनातील विक्रमी कार्याबद्दल जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानचा गौरव करताना तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा.

नरेंद्राचार्य महाराज संस्थानचा सन्मान
रक्त संकलनातील योगदान; तेलंगणात राज्यपालांच्या हस्ते गौरव
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ : रक्त संकलनातील उत्कृष्ट कार्याबद्दल तेलंगणा राज्याच्यावतीने जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानचा सन्मान करण्यात आला. क्षेत्र कामारेड्डी येथील तेलंगणा उपपिठाच्या प्रमुखांनी तो स्वीकारला.
जागतिक रक्तदातादिनानिमित्त तेलंगणामधील हैद्राबाद येथील राजभवनात रक्तदान मोहिमेत उत्कृष्ट कामाबद्दल सत्कार करण्यात आले. त्यात राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते रक्तदान संकलनातील उत्कृष्ट योगदानाबद्दल जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानला सन्मानित करण्यात आले. या वेळी कामारेड्डीचे जिल्हाधिकारी आशिष सांगवान तसेच रेड क्रॉस संघटनेचे अध्यक्ष एम. राजण्णा यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्यावतीने तेलंगणा पीठ प्रमुख काकासाहेब वनारसे, रुग्णवाहिका उपक्रम प्रमुख नरेश सावकार तसेच आध्यात्मिक उपक्रम प्रमुख कृष्णा गौंड यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने गेली २५ वर्षाहूनही अधिक काळ जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्यावतीने रक्तदानाचे जीवनदायी कार्य सातत्याने सुरू आहे. ४ ते १९ जानेवारी या पंधरा दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्रासह तेलंगणा, कर्नाटक, गोवा, छत्तीसगडसारख्या विविध राज्यांत रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली होती. त्यामधून एक लाख ३६ हजार २७२ रक्त बाटल्यांचे विक्रमी संकलन केले. हे सर्व रक्त त्या त्या विभागातील शासनाच्या रक्तपेढ्यांना देण्यात आले. संस्थानाच्या, रक्तदानाच्या व्यापक आणि जीवनदायी कार्याचा समाजातील विविध स्तरातून नेहमीच गौरव होत असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Raid on Congress MLA : मोठी बातमी! काँग्रेस आमदाराच्या ठिकाणांवर 'ED'चे छापे; कोट्यवधींचे सोने अन् रोकड जप्त

स्वातंत्र्यापूर्वीच्या नोटांवर गांधी नव्हे, नेताजींचा फोटो! आरबीआयच्या आधीची बँक कोणती? वाचा नेताजींच्या चलनाची अज्ञात कहाणी

Latest Marathi News Live Updates : छत्रपती संभाजी नगर तालुक्यात ढगफुटी

Rohit Sharma ODI retirement: 'काय निवृत्ती घेऊ? प्रत्येकवेळी जिंकलो म्हणून...' रिषभ पंतला रोहितचा सवाल

Thane News: डोंबिवलीत जुनी इमारत पाडकामात महापालिकेच्या स्कायवॉकचे नुकसान, प्रवाशांसाठी मार्ग बंद

SCROLL FOR NEXT